Breaking News

१५ दिवसात ९४८ विज ग्राहकांचा विज पुरवठा तोडला!


महावितरण कंपनी थकबाकी वसुलीसाठी आक्रमक

३६० कोटी रूपयांची थकबाकी; १५ दिवसात ९४८ विज ग्राहकांचा विज पुरवठा तोडला

बीड (एस.एम.न्युज़) - जिल्ह्यातील वीज बिलांच्या थकबाकीचा वाढत जाणारा डोंगर कमी करण्यासाठी महावितरण कंपनी आक्रमक झाली आहे. विवीध वर्गवारीतील वीजग्राहकांकडे तब्बल ३६० कोटी रूपयांची थकबाकी साचलेली आहे. वसुलीसाठी मोठ्या अधिकाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग असलेल्या पथकांची नेमणूक करून प्रत्येक थकबाकीदाराच्या दारापर्यंत लाईनमन पोहचत आहेत. वीजग्राहकांनी चालूबिलांसह थकबाकी त्वरीत भरावी अन्यथा नाईलाजास्तव दंडात्मक कारवाई करावी लागेल असे आवाहन बीड मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रेमसिंग राजपूत यांनी केले आहे.
बीड जिल्ह्यातील थकबाकीदारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. महावितरण कंपनीने बील भरण्याचे विविध पर्याय उपलब्ध करून दिले असले तरी वीजग्राहक दरमहा वीजबील भरण्यास टाळाटाळ करीत आहेत. वीजजोडणी दिल्यापासून आजतागायत एकही बील न भरलेले ७३३९ वीजग्राहक असून त्यांच्याकडे ११ कोटी ४८ लाख रूपयांची थकबाकी आहे. तसेच एप्रिल २०२४ पासून वीज देयकाचा भरणा न केलेल्या ग्राहकांची संख्या ६७७२४ असून त्यांच्याकडे १०४ कोटी ३५ लाखांची थकबाकी आहे. तर वीजबील न भरल्यामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडीत केलेले ग्राहक १ लाख २ हजार ९७२ असून त्यांच्याकडे २४३ कोटी ४२ लाख रूपयांची थकबाकी आहे.
थकबाकी वसुलीसाठी  लातूर परिमंडल कार्यालयाचे अधिकारी जिल्ह्यात फिरत असून गेल्या १५ दिवसात १३ कोटी ९४ लाख रूपयांचे वीजबील वसूल करण्यात आले असून बील न भरणाऱ्या ४२७ ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी तोडण्यात आला असून ५२१ वीजग्राहकांचा तात्पुरत्या स्वरूपात वीजपुरवठा तोडण्यात आला आहे. वसुली मोहीम मार्च अखेर पर्यंत प्रभावीपणे राबवण्यात येणार असून वीजग्राहकांनी चालू बिलांसह थकबाकीचाही भरणा करावा अन्यथा कटू कारवाईस सामोरे जावे लागेल असा ईशारा महावितरण कंपनीने दिला आहे. कायम स्वरूपी वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेल्या वीजग्राहकांना अभय योजने अंतर्गत थकबाकी वरील व्याज व दंड माफ करण्यात येणार असून योजनेचा लाभ ग्रहकांनी घ्यावा असेही महावितरण कंपनीने म्हटले आहे.

*तर शेजाऱ्यावर ही कारवाई - प्रेमसिंग राजपूत (अधीक्षक अभियंता, बीड मंडळ)*

विजग्राहकांना अखंडीत विज पुरवठा करण्यासाठी प्रत्येक युनीटचे विज बिल वसूल होणे गरजेचे आहे. विजबिल भरण्यासाठी घरबसल्या विविध पर्याय महावितरण कंपनीने उपलब्ध करून दिले असून त्याचा लाभ विज ग्राहकांनी घ्यावा. वसुली मोहीमे दरम्यान विज पुरवठा खंडीत केलेल्या ग्राहकाचा विज पुरवठा सुरू असल्याचे दिसून आल्यास विज कायद्यान्वये दंडात्मक कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर विज पुरवठा खंडीत केलेल्या विज ग्राहकास शेजाऱ्याने विज पुरवठा दिल्यास त्या शेजाऱ्यावरही कारवाई करण्याचे प्रावधान विज कायद्यात असून त्यानुसार संबंधीतांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत