Breaking News

उपचारासाठी दानशूर लोकांनी मदत करण्याचे आवाहन


९ वर्षानंतर पुन्हा चालण्यासाठी बळ देण्याचे आवाहन

अनावधानाने घडलेल्या अपघातामुळे मुलगी एकाच जागेवर पडून


उपचारासाठी दानशूर लोकांनी मदत करण्याची गरज


पाटोदा (एस.एम.न्युज़) - घरात अठरा विश्व दारिद्र्य पाचवीला पुजलेले. त्यात सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या सायमा या मुलीच्या पाठीवर खेळताना बैलगाडी पल्टी झाली. त्यामुळे गेल्या ९ वर्षापासून सायमा ही अंथरुणावर झोपूनच आहे. असे असले तरी एक दिवस आपण आपल्या पायावर पुन्हा चालु शकू असा विश्वास ती आपल्या बोलण्यातुन व्यक्त करते. ९ वर्षानंतर पुन्हा चालण्यासाठी बळ मिळावे. अनवधनाने घडलेल्या अपघातामुळे एकाच जागी अंथरुणावर पडून असलेल्या सायमा च्या उपचारासाठी दानशूर लोकांनी मदत करण्याची गरज आहे.
पाटोदा शहरापासून काही अंतरावरील शेतात सालगडी म्हणून राहत असलेल्या हुसेन बेग यांची मुलगी सायमा इयत्ता सातवीमध्ये शिकत असताना सुट्टीच्या दिवशी शेतात राबणाऱ्या आपल्या वडिलांसोबत गेली होती सोबतीला भावंडेही होती. मोकळ्या जागेत सोडलेल्या बैलगाडीवर भावंडे खेळत असताना सायमा बैलगाडी खाली झोपली असता अनवधनाने बैलगाडी वर झाली व सायमाच्या कमरेवर बैलगाडी पल्टी झाल्याने सायमाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे सायमाला अहेमदनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारात तिला फरक ही जाणवू लागला होता. मात्र घरातील अठरा विश्व दारिद्र्य आडवे आले व उपचार थांबवावे लागल्याने गेल्या ९ वर्षापासून सायमा ही अंथरुणावर पडून आहे. मात्र तिची इच्छाशक्ती एवढी दृढ आहे की, अशा अवस्थेत सुद्धा ती आपल्या पायावर चालण्याचे स्वप्न पाहते आहे. मात्र  बेग कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच असुन वडील सालगडी तर आई शेतमजूर असल्याने सायमावर उपचार कसे करावे या विवंचनेत आहे.

*मदतीसाठी दानशूर लोकांनी पुढे  यावे*

काही कारणास्तव शेतात गेल्याने हा गंभीर प्रकार समोर दिसून आला असून याबाबतीत मी मित्रपरिवाराकडे आवाहन केले असुन काही मदत उपलब्ध झाली आहे. त्यातून आम्ही २-३ दिवसात पुणे येथील संचेती हॉस्पिटलमध्ये जाणार आहोत. तरी कोणाला या निरागस मुलीला मदत करायची असेल त्यांनी माझ्या मो.क्रमांक 8888455282 वर मदत करावी किंवा प्रत्यक्ष भेट घ्यावी.

- सय्यद शफाउद्दीन (किसान मशनरी) पाटोदा

*आमच्यानंतर या मुलीचं काय होणार?*

आमच्या परिस्थिती नुसार जे करता येईल ते आम्ही करत आहोत मात्र आम्ही गेल्यानंतर आमच्या मुलीचं काय होईल या विचारानेच आमचं कुटुंब खचत आहे.

- सफिया बेग (आई)

*तर..पुन्हा मी चालु शकेन*

गेल्या ९ वर्षांपासून मी एका जागेवरच असून माझ्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खुप खालावलेली आहे. इच्छा असुनही ते माझ्यावर उपचार करू शकत नाहीत. दानशूर लोकांनी आर्थिक मदतीचे सहकार्य केले तर मी पुन्हा आपल्या पायावर चालू शकेन.

- सायमा बेग (पिडीत मुलगी)


==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत