ऐतिहासिक बीबी का मकबरा मध्येही उर्दू भाषेसोबत सापत्न वागणूक
शालेय शिक्षण न घेतलेले परंतु अरबीतून क़ुरआन वाचणारे मुसलमानही उर्दू वाचतात
उर्दू ही फक्त मुसलमानच नाही तर सर्वांसाठी शुद्ध भारतीय भाषा आहे
बीड (एस.एम.न्युज़) - जिल्ह्याशेजारील औरंगाबाद आताचे छत्रपती संभाजीनगर येथे असलेल्या ऐतिहासिक बीबी का मकबरा मध्ये उर्दू भाषेतूनही माहिती फलक लावण्यात यावे अशी मागणी देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग नवी दिल्लीचे महासंचालक, औरंगाबाद कार्यालयाचे संचालक, मराठवाडा विभागीय आयुक्त, औरंगाबाद चे जिल्हाधिकारी, औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त, महापौर व विरोधी पक्षनेते यांना बीड जिल्हाधिकारी यांच्या मार्फत एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक एस.एम.युसूफ़ यांनी पाठविलेल्या निवेदनातून केली असून शालेय शिक्षण न घेतलेले परंतु अरबीतून क़ुरआन वाचणारे मुसलमानही उर्दू वाचतात असे निवेदनातून म्हटले आहे.
याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्रातील आजच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरात असलेला आपला ऐतिहासिक वारसा बीबी का मकबरा, जो सम्राट औरंगजेबाने शतकानुशतकांपूर्वी बनविलेला आहे. ही ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून तीन माहिती फलक तिथे लावण्यात आलेले आहेत. जे हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषांमध्ये आहे. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे असे आपण भारतीय मानतो. मराठी ही महाराष्ट्राची भाषा आहे. जी संपूर्ण महाराष्ट्रापेक्षा मराठवाड्यात जास्त वापरली जाते आणि इंग्रजी ही पाश्चात्य भाषा आहे. बीबी का मकबरामध्ये या तिन्ही भाषांमधील फलक लावण्यात आलेले आहेत. बीबी का मकबरा पाहण्यासाठी येणारे पर्यटक केवळ महाराष्ट्र आणि आपल्या भारत देशातूनच नव्हे तर जगभरातून येतात. म्हणून बीबी का मकबरा विषयी थोडक्यात माहिती देण्यासाठी हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषांमध्ये माहिती फलक लावण्यात आलेले आहेत. पण उर्दू भाषेकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यावरून बीबी का मकबरामध्ये उर्दू भाषेला सापत्नपनाची वागणूक दिल्याचे दिसून येते. उर्दू भाषा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात लिहिली आणि वाचली जाते. तसेच पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका इत्यादी शेजारील देशांबरोबरच इतर इस्लामिक देशांमध्येही वाचली जाते. बीबी का मकबरा पाहण्यासाठी संपूर्ण भारतातून तसेच परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने दररोज येतात. ज्यामध्ये मुस्लीम पर्यटकही मोठ्या संख्येने असतात. ज्यापैकी अनेकजणांनी कधीही शालेय शिक्षण घेतलेले नसते. म्हणून त्यांना हिंदी, मराठी, इंग्रजी भाषा वाचता किंवा लिहिता येत नाही. पण ते मुस्लिम असल्याने क़ुरआन वाचतात आणि बहुतेक मुस्लिम अरबी भाषेतूनच क़ुरआन वाचतात. यामुळे अरबी भाषेशी साधर्म्य असलेली उर्दू भाषाही क़ुरआन वाचणाऱ्यांना अवगत असते आणि तसेही उर्दू भाषा ही परदेशी भाषा नसून ही भाषा भारतातच जन्मली आणि वाढली आहे. उर्दू ही भाषा शुद्ध भारतीय आहे. या भाषेत पारंगत असलेले आपल्या भारत देशामध्ये मोठमोठे विद्वान, शाहीर, लेखक, कवी होऊन गेले आणि आजही आहेत. ही केवळ मुस्लिमांची भाषा नसून संपूर्ण भारताची भाषा आहे. म्हणून बीबी का मकबरामध्ये ज्याप्रमाणे हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषेतील माहिती फलक लावण्यात आले आहेत, त्याचप्रमाणे उर्दू भाषेतही माहिती फलक लावण्यात यावेत. बीबी का मकबरा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना, ज्यांना हिंदी, मराठी आणि इंग्रजी येत नाही, परंतु ज्यांना उर्दू भाषा वाचता येते, ज्यांना समजते, अशा पर्यटकांसाठी बीबी का मकबरामध्ये उर्दू भाषेतील माहिती फलक लावणे आवश्यक आहे. म्हणून हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषेतील फलकांसह उर्दू भाषेतील माहितीचे फलक बीबी का मकबरा येथे लावण्यात यावेत. अशी मागणी एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक एस.एम.युसूफ़ यांनी बीड जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
*ऐतिहासिक वास्तूंची निगा राखणे व जतन करणे शासन-प्रशासनाचे कर्तव्य!*
महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील ऐतिहासिक वास्तू समोर हिंदी, इंग्रजी सह उर्दू भाषेतूनही माहिती फलक लावण्याची गरज आहे. बीबी का मकबरा हे फक्त एक उदाहरण आहे. प्रत्यक्षात महाराष्ट्र आणि संपूर्ण देशात मुघल कालीन अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यांची निगा राखणे, जतन करणे, वेळोवेळी डागडूजी करणे. त्यांच्या विषयी चे माहिती फलक हिंदी, इंग्रजी सह उर्दूतून ही लावणे गरजेचे आहे. अशा ऐतिहासिक वास्तूंमुळे आपल्याला फक्त आपल्या देशाचा इतिहासच कळतंय असे नाही तर अशा ऐतिहासिक वास्तूंमुळे दररोज शासनाच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात महसुलही जमा होतोय.
*शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळण्याचे स्त्रोत!*
बीबी का मकबरा बद्दलच पाहिलं तर येथे येणाऱ्या भारतीय पर्यटकाला प्रति व्यक्ती २५ रुपये तर देशाबाहेरील पर्यटकाला प्रत्येकी ३०० रुपये तिकीट दर आकारण्यात येते. शिवाय येथे सम्राट औरंगजेब यांच्या पत्नी असलेल्या बीबी दिलरास बानो यांच्या कबरीला पाहून अनेक पर्यटक मनाला येईल तेवढे पैसे कबरीवर टाकतात. तिकिटाव्यतिरिक्त कबरीजवळ जमा होणारी ही रक्कमही लाखो रुपयाचा महसूल शासनाला मिळवून देत आहे. यामुळे अशा ऐतिहासिक वास्तूंचे योग्य जतन करणे हे ऐतिहासिकदृष्ट्याच नाही तर आर्थिक दृष्ट्या ही महत्त्वाचे आणि गरजेचे आहे. याचा विचारही शासन-प्रशासनाने करणे अत्यंत आवश्यक आहे.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा