*जैन समाजाबाबत चुकीचा समज*
*जैन समाजाबाबत चुकीचा समज*
जैन धर्मात ५०% पेक्षा जास्त लोक गरीब आहेत. पण मीडियासमोर येतो तो अतिश्रीमंत असणारा जैन समाज, जो १०-२०% असेल. या १०-२०% असणाऱ्या अतिश्रीमंत समाजाला जैन धर्म, जैन तत्वे, त्या समाजातील गरीब लोक यांचे काहीही देणे-घेणे नाही.
स्वतःचा व्यापार वाढवणे, मोठ-मोठ्या बोल्या लावणे, समाजकार्य किंवा नाव म्हणून त्यातील काही % रक्कम उपकार केल्यासारखी दान करणे एवढेच ते करतात.
जैन धर्मातील अनेक मंदिरे, प्राचीन अवशेष आज संपवले जात आहेत. बहुतेक ठिकाणी त्याचे वैदिकीकरण होत आहे. त्याबद्दल यातील बहुतेक मान्यवर ब्र ही उच्चारत नाहीत. स्वतःचा व्यापार वाढला, नाव झाले, काम झाले तेवढे त्यांना पुरेसे असते.
पैसे टाकून कुठलीही गोष्ट केली जाऊ शकते असा त्यांना ठाम विश्वास आहे.
सामान्य जैन बिचारा अनेक गोष्टींच्या विवंचनेत आहे. सामान्य जैंनांना शिक्षण करण्यातही असंख्य अडचणी येत आहेत. त्यातूनही संघर्ष करून जे पुढे जातात, आपलं कर्तुत्व गाजवतात अश्या मध्यमवर्गीय जैन तरुणांना सुशिक्षित, निर्व्यसनी, प्रामाणिक असून सुद्धा लग्नासाठी प्रचंड अडचणी येतात. कारण बंगला, कार आणि इतर गोष्टींच्या दिखाव्याला प्रचंड महत्व आले आहे. तेच अतिश्रीमंतांची मुले व्यसने असली तरी त्यांची सहज लग्न होतात.
जैन धर्माची मुळ तत्वे अशी दिखावा करण्याची नाहीत तर भूमिका घेण्याची आहेत. महावीरांच्या काळातही विषमता होती, ज्ञान देण्या-घेण्याचा अधिकार फक्त वैदिक ब्राम्हणांना होता. अगदी महावीरांचे वडील स्वतः राजा असूनही त्याविरुद्ध भूमिका घेऊ शकत नव्हते. जो भूमिका घेईल तो देशद्रोही, धर्मद्रोही ठरवला जायचा. महावीरही आहे त्या रचनेचे पालन करत ऐशोरामात आयुष्य जगू शकले असते पण महावीरांनी भूमिका घेतली, त्यांनी समतेचा पुरस्कार केला, ज्ञान सर्वांसाठी खुले केले आणि अनेक चुकीच्या गोष्टींना थांबवले. त्यामुळे ते वीराचे महावीर झाले.
आपले राज्य सोडून संन्यास घेणारे, दान करणारे, तप करणारे बरेच राजकुमार झाले पण त्यातील कुणालाही महावीरांएवढे महत्व प्राप्त झाले नाही. महावीरांचे वेगळेपण हे सत्य आणि समतेसाठी निर्भयपणे बुद्धीप्रामाण्यवादी भूमिका घेण्यात आणि तशी व्यवस्था निर्माण करण्यात आहे. तर आजही निर्भयपणे समता, प्रेम आणि अहिंसेसाठी ठाम भूमिका घेऊन आपण तिकडे एक पाऊल उचलूया..
लेखन - *संकेत मुनोत*
बीड
संपर्क - *8668975178*
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा