Breaking News

सायमा बेग च्या मदतीसाठी हात पुढे सरसावू लागले; एस.एम.न्युज़ च्या बातमीची दखल


सायमा बेग च्या मदतीसाठी हात पुढे सरसावू लागले; एस.एम.न्युज़ च्या बातमीची दखल

पुणे येथील संचेती हॉस्पिटल मध्ये सायमाला उपचारार्थ केले भरती

बीड (एस.एम.न्युज़) - जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील सायमा हुसेन बेग या मुलीच्या पाठीवर नऊ वर्षांपूर्वी बैलगाडी पडल्याने तिचे पाय कमरेपासून लुळे पडले आहेत. ही बाब काही दिवसांपूर्वी समाजातील काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनात आल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी हुसेन बेग यांच्या घरी भेट देऊन सायमाची अवस्था जाणून घेतली आणि एस.एम.न्युज़ ला याविषयी बातमी प्रसिद्ध करण्यासाठी दिली. ही बातमी एस.एम.न्युज़ ने ठळकपणे प्रकाशित केल्यानंतर समाजातून दानशूरांचे हात सायमाच्या उपचारार्थ आर्थिक मदतीसाठी सरसावले आहेत. यामुळे सायमावर उपचार करण्याकरिता पाटोदा तालुक्यातील सय्यद शफाउद्दीन, धडाडीचे संपादक हमीद खान पठाण, जे.एस. न्यूज चे पत्रकार शेख जावेद यांनी सायमा ला तिच्या आई-वडिलांसह घेऊन पुणे येथील संचेती हॉस्पिटल मध्ये नेऊन भरती केले आहे. तिथे तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले असून यासाठी दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून राबणाऱ्या सायमाच्या आई-वडिलांना आर्थिक मदतीची गरज आहे. जेवढी जास्त रक्कम जमेल तेवढ्या लवकर तिच्यावर पुढील उपचार होत राहील. सायमाला दवाखान्यात भरती केल्याचे कळाल्यानंतर मानुर, ता.शिरुर, जि.बीड येथील एक हात मदतीचा युवा फौंडेशनच्या वतीने १०००० हजारांचा चेक व ५००० रोख  मनोज नागनाथ रणशींग,शेख मुस्तफा यांनी अहेमदनगर येथील चांदणी चौकात सायमा चे वडील हुसेन बेग यांना दिले. तर सय्यद बिलाल हारुन यांनी ही माहिती मिळताच १०००० सय्यद शफाऊद्दीन यांच्या फोन पे वर पाठवून मदत केली. यावेळी सय्यद शफाऊद्दीन, संपादक हमीदखान पठाण, पत्रकार जावेद शेख यांची उपस्थिती होती. सायमा बेग हिच्यावर उपचार सुरू असेपर्यंत दानशुरांनी मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत