लेखिका रूपाली देशपांडे यांना जागतिक स्त्रीरत्न पुरस्कार जाहीर
लेखिका रूपाली देशपांडे यांना जागतिक स्त्रीरत्न पुरस्कार जाहीर
बीड (एस.एम.न्युज़) - आपल्या परखड व सडेतोड लेखणीने अल्पावधीतच वाचकप्रिय ठरलेल्या लेखिका तथा उद्योजिका रूपाली देशपांडे यांना जागतिक महिला दिनानिमित्ताने पत्रकार संघ आणि आश्रय सेवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने जागतिक स्त्रीरत्न पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
या पुरस्कारासाठी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या, कायम वेगळेपण जपणाऱ्या, बीड जिल्ह्यातील पहिल्या महिला इव्हेंट मॅनेजर रूपाली जयंत देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे. मूळ बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या तथा लेखिका रूपाली जयंत देशपांडे यांनी मृत्यूवर मात करत नव्याने आपले आयुष्य नेत्रदीपक करण्याचा प्रयत्न आपल्या अथक परिश्रमातून केला आहे. बीड जिल्ह्यातील भावी पिढी सुसंस्कारी घडावी यासाठी रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतन सारखे एक आदर्शवत गुरुकुल बीडमध्ये निर्माण करण्याचा मानस रूपाली देशपांडे यांनी स्वप्नी बाळगला आहे. धोंडीपुरात वीस वर्षांपूर्वी पहिले जनरल स्टोअर दुकान सुरू करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. या व्यवसायानंतर लग्न मंडपाचा व्यवसाय सुरू करणाऱ्या देखील त्या बीड च्या पहिल्याच महिला होत्या. एवढेच नव्हे तर पुढे त्यांनी इव्हेंट मॅनेजर म्हणून काम सुरू केले. हे काम देखील पहिल्या महिला म्हणूनच त्यांनी सुरू केले. त्यांच्या या जीवन कार्याची दखल घेऊन, त्यांनी स्वीकारलेले आव्हानात्मक वेगळेपण लक्षात घेऊन पत्रकार संघ आणि आश्रय सेवा केंद्राच्या वतीने ८ मार्च २०२५ रोजी त्यांना जागतिक स्त्रिरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारात सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. रूपाली देशपांडे यांना जागतिक स्त्रीरत्न पुरस्कार जाहीर झाल्याने समाजाच्या सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा