Breaking News

मिल्लिया गर्ल्स हायस्कूलमध्ये गणित दिनानिमित्त गणिताचा समावेश असलेल्या प्रकल्पाचे प्रदर्शन


मिल्लिया गर्ल्स हायस्कूलमध्ये गणित दिनानिमित्त गणिताचा समावेश असलेल्या प्रकल्पाचे प्रदर्शन

बीड (एस.एम.न्युज़) - प्रसिद्ध गणितज्ञ श्रीनिवासन रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त मिल्लिया गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ विद्यालयात गणित दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिल्लिया हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सिद्दीकी इरफान सादुल्ला हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार तथा प्रा. जावेद पाशा आणि मिल्लिया ज्युनियर कॉलेजचे गणित विभागाचे व्याख्याते बासित देशमुख या वेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना जावेद पाशा म्हणाले, गणित हा विषय जीवनातील प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाचा आहे. त्याशिवाय विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कल्पनाच करता येत नाही. गणिताची भीती बाळगू नका. समजून घेऊन वाचाल तर तो सोपा विषय आहे. असे म्हटले. दुसरे पाहुणे बासित देशमुख म्हणाले की, शिक्षणादरम्यान आणि नोकरीच्या काळातही मी यशस्वी होतो. आपल्या अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक सिद्दीकी इरफान सादुल्ला यांनी शाळेच्या कामगिरीचे सादरीकरण करून गणित विषयावर अल्पावधीत असे उत्कृष्ट प्रकल्प सादर केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे व गणिताच्या शिक्षकांचे विशेष कौतुक केले. नसरीन फरहाना, डॉ. वासिया तखवीम, शाळेचे उपमुख्याध्यापक खुर्शीद अहेमद, सय्यदा सुमिया, हमाबिन सायरी, सय्यदा अफिफाह फातिमा, फहमिदा बेगम आणि खान जरीना यांनी मार्गदर्शन केले.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत