क्लासेसवाल्यांनी शिक्षणाचा बाजार करून ..... सोडल्या!*
*क्लासेसवाल्यांनी शिक्षणाचा बाजार करून ..... सोडल्या!*
पालक, पाल्य आणि शिक्षण हा एक मोठा विषय आहे. आज यावर पहिला भाग. सध्या शालेय किंवा कॉलेज मधील शिक्षण जेवढे महत्वाचे आहे. तेवढेच कदाचित त्याही पेक्षा जास्त महत्वाचे अवांतर क्लासेस चे महत्व वाढले आहे. हे महत्व कोणी वाढवले तर क्लासेस आणि पालकांनी.
शाळा,कॉलेज यांनी या क्लासेसना वरती उचलून धरले. या क्लासेसनी तर लाजा सोडल्यात. यांना तर हे क्लासेस म्हणजे सोन्याची खान सापडल्या सारखंच झालं आणि यांना मोठे करणारे पालक तर काय जसे क्लासेस ने लाजा सोडल्या तसे पालकांनी हि लाजा सोडल्यात. कारण त्यांना असे झाले कि क्लास लावला तरच आपण समाजात टिकून राहू. बडेपणा मिरवण्यासाठी यांनी लाजा सोडल्यात. या बडेजावपणात यांचे किती नुकसान होते आणि काहीही कारण नसताना क्लासेसवाल्यांना श्रीमंत करण्याचे काम हे पालक करत आहेत. शाळा, कॉलेज मध्ये शिकवले जाणारे सर्व विषय परत हे क्लासवाले शिकवतात. मुलांना जर तिथले समजत नसेल तर शाळा, कॉलेज वाले काय हिब्रू भाषेत शिकवतात का? का क्लासेसवाल्यांना मोठे करण्यात यांचा हि हात आहे?
शाळेत शिकवणारे सगळे विषय परत हे क्लास वाले शिकवतात. मग मुलाना हे शाळेत समजत नसेल आणि पालकांना परत या सर्व विषयांचा क्लास लावण्याची गरज भासत असेल तर मग शाळा, कॉलेज बंद करावेत आणि शाळा कॉलेज चे सर्व अधिकार या क्लासेसवाल्यांना द्यावेत. यात पालकांचा पैसा आणि मुलांचा वेळ वाचेल आणि मुलंही जरा मोकळ्या वेळेत जरा श्वास घेतील. मुलांना तर दावणीला बांधल्या सारखंच आहे. मुलं तरी एकच विषय दोन वेळेस शिकत असतील तर त्यांना किती त्रास होत असेल. हे ही पाहायला हवं. आता तर अगदी ज्या विषयांची डबल शिकण्याची गरज नसेल त्याही विषयाचा क्लास आहे. आपली पोरं इतकी मतिमंद झालीत का? कि सगळ्याच विषयांना क्लास लावावा लागेल, याचा ही विचार करायला हवा. किती पैसा यात पालकांचा जातो. शाळेतील खर्च वेगळा आणि क्लास मधील वेगळा ज्या पालकांची जेमतेम परिस्थिती आहे, त्यांनी काय सामूहिक पद्धतीने आत्महत्या करावी का?
साधारण परिस्थिती आहे आणि रोजच्याच रोजी रोटीचा प्रश्न अश्या मुलांना हे क्लासवाले कमी पैशात शिकवतात का? हे पाहिले पाहिजे. आता तर पायलीचे पन्नास क्लास आहेत. प्रत्येक गल्लीत हे क्लासेस आहेत. या सर्वांचा पालकांनी विचार करावा. तुम्ही मुलांना फक्त शिक्षण देणारे पालक नाहीत तर मुलांचे लाडके आई-वडील आहात, त्यांचा सर्वागीन विकास करायला हवा. शालेय शिक्षणाव्यतिरिक्त मूल्य शिक्षण आवश्यक आहे. मुलांना यातूनच वेळ मिळत नाही तर बाकी शिक्षण कधी करावे. शालेय शिक्षण सोडून मुलांनी आयुष्य कसे असावे, जीवनाचा धडा हि शिकणे आवश्यक आहे. हे पालक कधी विचार करतील कुणास ठाऊक. खरंतर पालकांना हि वेळ मिळत नाही. कारण मुलांना या क्लास मधून त्या क्लास मध्ये आणि यातून त्या क्लास मध्ये सोडवतच वेळ मिळत नसेल तर पालकांनो जरा थांबा, थोडा श्वास घ्या आणि स्वतःलाच विचारा कि खरंच या सर्वांची गरज आहे का? या क्लासेस मधील प्रत्येक विषयाची शिकवणी ची खरंच गरज आहे का?
नसेल गरज तर मग हे सर्व तुम्ही स्वतः बंद करा. आवश्यक असलेले त्याचीच शिकवणी लावा तुमची आर्थिक आणि वेळेची बचत करा. मूकबधिर असल्या सारखे करू नका. आवाज करा, बोला धडाधड आणि मुलांचा हि आतला आवाज ऐकायचा प्रयत्न करा. मुलं तुमच्या आणि क्लासेस च्या दावणीला बांधलेले जनावर नाहीत हे लक्षात घ्या.
पालकांनो, तुम्ही हुशार होतात म्हूणन तुम्हाला तुमच्या काळात फक्त दोनच विषयाला शिकवणी होती. इंग्लिश आणि गणित. आताची पिढी तर तुमच्यापेक्षा खूप हुशार आहे, मग खरंच या शिकवणी चा खटाटोप आवश्यक आहे का? सर्व प्रश्नाचा बारकाईने विचार करा आणि तुमच्या पाल्याला जरा श्वास घेऊ द्या.
क्लासवाल्यांनो जरा तर काही शरम ठेवा जणाची नसली तरी मनाची तरी. किती पैसे घ्यायचे? त्या शिकवणीचे. तुम्ही आज क्लास सुरु केला कि पुढच्या वर्षात तुमचे दोन-तीन मजली घरे होतात. ते फक्त याचं पैशातून आहे. तर तुम्हाला थोडी तरी बाळगावी लागेल. शिक्षण हे ज्ञानांचे मंदिर आहे. जास्तीचे पैसे घेऊन आणि दर वर्षाला वारेमाप फिस वाढवण्याचा धंदा नाही, हे लक्षात घ्यावे. हा जो तुम्ही लोकांनी शिक्षणाचा धंदा केला आहे ना तो तात्काळ थांबवा. पालक आणि मुले जागरूक झाले तर तुम्ही हा जो धंदा करणार आहात ना त्याचे शटर लवकरच बंद होतील हे लक्षात घ्या.
उर्वरित पुढील अंकात
*लेखन - रूपाली देशपांडे*
बीड
संपर्क - *8888955539*
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा