जिल्हाधिकारी साहेब, ई-केवायसी न झाल्यास जिल्ह्यातील रेशन कार्डधारक लाभापासून वंचित राहणार राशन दुकानदारांच्या मागणीकडे लक्ष देणे आवश्यक!
जिल्हाधिकारी साहेब, ई-केवायसी न झाल्यास जिल्ह्यातील रेशन कार्डधारक लाभापासून वंचित राहणार
राशन दुकानदारांच्या मागणीकडे लक्ष देणे आवश्यक!
बीड (प्रतिनिधी) - शासनाने सर्व राशन कार्डधारकांना ई-केवायसी करून घेणे आवश्यक असल्याचे म्हटले असले आणि महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात राशन कार्ड धारकांचे ई-केवायसी करण्यात आले असले तरी फक्त बीड जिल्हा राशन कार्ड धारकांचे ई-केवायसी करण्यात मोठ्या प्रमाणात मागे राहिला आहे. हे पाहता शासनाने दिलेल्या ३१ डिसेंबर २०२४ पर्यंतच्या मुदतीत संपूर्ण बीड जिल्ह्यातील राशन कार्ड धारकांचे ई-केवायसी पूर्ण करण्यात आले नाही तर बीड जिल्ह्यातील हजारो राशन कार्ड धारक शासनाकडून राशन कार्ड द्वारे मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहतील. याला कारण बीड जिल्ह्यातील राशन दुकानदारांची मागणी ठरणार आहे. म्हणून आता जिल्हाधिकारी यांनीच याकडे जातीने लक्ष घालून येत्या ३१ डिसेंबर २०२४ पूर्वी राशन कार्ड ची ई-केवायसी मुदत संपण्यापूर्वी राशन कार्ड धारकांचे ई-केवायसी पूर्ण करण्याचे आदेश देऊन त्यावर अंमलबजावणी करून घेणे गरजेचे आहे.
जेव्हापासून शासनाने राशन कार्ड ची ई-केवायसी करण्याचे आदेश दिले आहे, तेव्हापासून महाराष्ट्रभरातील अनेक जिल्ह्यातील तहसील कार्यालय, पुरवठा विभाग आणि राशन दुकानदार यासाठी कामाला लागले होते आणि बहुतेक बीड जिल्हा वगळता राज्यातील बहुतांश जिल्ह्यांनी राशन कार्ड धारकांची ई-केवायसी करून घेतली आहे. परंतु प्रत्येक बाबतीत अपवाद आणि मागास ठरत असलेला बीड जिल्हा यात सुद्धा मागे राहिला आहे. या जिल्ह्यातील राशन दुकानदारांनी राशन कार्ड ची ई-केवायसी करण्याकरिता शंभर रुपये दर आकारणी राशन कार्ड धारकांकडून वसूल करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती परंतु याची दखल न घेतली गेल्याने तसेच या कामी शासनाकडून अतिरिक्त कमिशन किंवा रक्कम त्यांना देण्यात येत नसल्याने म्हणा, बीड जिल्ह्यातील राशन दुकानदारांनी आतापर्यंत राशन कार्ड धारकांची ई-केवायसी करण्याचे कार्य सुरू केलेले नाही. एकाध दुसरा अपवाद वगळता विना मोबदला राशन कार्ड धारकांची ई-केवायसी न करण्याच्या आपल्या भूमिकेवर सर्व राशन दुकानदार अजूनही ठाम असल्याचे तसेच ई-केवायसी करत नसल्याचे दिसत आहे. जर ३१ डिसेंबर पूर्वी बीड जिल्ह्यातील राशन कार्ड धारकांची ई-केवायसी करण्यात आली नाही तर मात्र राशन दुकानदार, पुरवठा विभाग, तहसील कार्यालय आणि जिल्हा प्रशासन तसेच शासन या सर्वांच्या मध्ये राशन कार्ड धारक राशन कार्डद्वारे मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहणार आहेत. म्हणजेच भरडले जाणार आहेत. परंतु याचे कुठलेही सोयरसुतक पुरवठा विभाग, तहसील कार्यालय, जिल्हा प्रशासन यापैकी कोणालाही असल्याचे दिसत नाही. राशन कार्ड धारकांची ई-केवायसी करण्याकरिता शासनाने दिलेली मुदत संपायला आता फक्त १२ दिवसांचा कालावधी उरला आहे. या १२ दिवसाच्या आत जर बीड जिल्ह्यातील राशन दुकानदारांकडून राशन कार्ड धारकांची ई-केवायसी करण्यात आली नाही तर मात्र राशन कार्ड धारक राशन कार्डद्वारे मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहतील. याकडे पुरवठा विभाग, तहसील कार्यालय आणि जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज असून याविषयी युद्ध पातळीवर पावले उचलण्याची गरज आहे.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा