Breaking News

अंधारे मॅडम, बीड नगरपरिषद स्वच्छता विभागाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष पंधरा दिवसांपूर्वी नाली काढली पण घाण उचलली नाही


 

अंधारे मॅडम, बीड नगरपरिषद स्वच्छता विभागाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष
पंधरा दिवसांपूर्वी नाली काढली पण घाण उचलली नाही
बीड (एस.एम.न्युज़) - बीड नगर परिषदेच्या दुर्लक्षपणामुळे संपूर्ण बीड शहरातील स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहेत. एक तर महीनोंमहिने नाल्या काढल्या जात नाहीत, काढल्या तर घाण उचलली जात नाही. असाच प्रकार गेल्या पंधरा दिवसांपासून ऐतिहासिक कारंजा टावर पासून जवळ असलेल्या जव्हेरी गल्ली येथे दिसत आहे. पंधरा दिवसांपूर्वी नाल्यांमधून काढलेली घाण नगर परिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी काढली खरी परंतु नालीच्या कडेला रस्त्यावर टाकलेली घाण अजूनही उचलली नाही म्हणून ती घाण मोकाट कुत्र्यांमुळे पुन्हा नाली मध्ये जात आहे. यामुळे येथील नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करू लागले आहेत. तसेच मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी जातीने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
अंधारे मॅडम या महिला अधिकारी बीड नगर परिषदेला मिळाल्याने पुरुष अधिकाऱ्यांपेक्षा त्यांच्याकडून बीड शहरातील नागरिकांना जास्त चांगल्या कामाची अपेक्षा होती परंतु बहुतेक बीड नगर परिषदेतील इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांचा धाकच राहिला नाही की काय अशी अवस्था बीड शहरात फेरफटका मारल्यानंतर दिसून येते. असाच प्रकार जव्हेरी गल्ली भागात असलेल्या जैन मंदिर समोर नालीतील घाण बीड नगर परिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी काढून नालीच्या कडेला रस्त्यावर टाकली होती. त्याला पंधरा दिवसाचा कालावधी उलटूनही ती घाण अद्यापपर्यंत स्वच्छता विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उचलून नेण्याची तसदी घेतली नाही. यामुळे ती घाण मोकाट कुत्र्यांमुळे परत नाली मध्ये जात असल्याने बीड नगर परिषदेच्या अशा गलथान कारभारामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे. याची दखल मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी घेणे आवश्यक आहे.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.


*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत