Breaking News

कारंजा टावर ते बलभीम चौक भागात नागरिक झाले त्रस्त; "त्या" दोन लाईनमनबद्दल नागरिकांचे प्रश्न!

बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील ऐतिहासिक कारंजा टावर ते बलभीम चौक या मोठ्या भागात गेल्या अनेक दिवसांपासून महावितरण कंपनीकडून अनियमित विद्युत पुरवठा करण्यात येत असल्याने दिवसातून दहा वेळेस या परिसरात लाईट बंद होत आहे. एकदा गेली की लवकर येत सुद्धा नाही. यामुळे या भागातील व्यापाऱ्यांसह नागरिकही मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत.
महावितरण कंपनीकडून दिवसेंदिवस वाढविण्यात येत असलेले वीज युनिट चे बील दरमहा भरून सुद्धा महावितरण कंपनी शहरातील अनेक भागात सुरळीत विद्युत पुरवठा करण्यास आजही पूर्णपणे सक्षम नसल्याचे दिसून येत आहे. दोन-तीन महिने जर वीज बिल थकीत राहिले तर महावितरण कंपनीचे अभियंता आणि कर्मचारी मोठा लावाजमा घेऊन थकीत बिल राहिलेल्या ग्राहकांचा विद्युत पुरवठा कापून टाकतात. एवढी तत्परता मात्र महावितरण कंपनी विद्युत पुरवठा नियमित व सुरळीत ठेवण्यासाठी मात्र दाखवीत नसल्याचा प्रत्यय शहरातील अनेक भागात येतो आहे. असाच अनुभव गजबजलेल्या ऐतिहासिक कारंजा टावर पासून ते बलभीम चौक पर्यंतच्या मोठ्या भागात गेल्या अनेक दिवसांपासून येत आहे. या भागात दिवस-रात्र दहा वेळेस विद्युत पुरवठा खंडित केला जातो. एकदा लाईट गेली की लवकर येत सुद्धा नाही. यामुळे मोठी बाजारपेठ असलेल्या या भागातील व्यापारी वर्ग आणि येथील रहिवासी नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. महावितरण कंपनीने या भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी करू लागले आहेत. विशेष म्हणजे महावितरण कंपनीचे दोन कर्तव्यदक्ष लाईनमन जे कर्तव्यावर असताना शहरातील इतर भागात अत्यंत तत्परतेने आपली सेवा देतात आणि विद्युत पुरवठा सुरळीत ठेवतात ते याच बलभीम चौक भागात राहतात. जिथे राहतात तिथेच विद्युत पुरवठ्याचा अशा प्रकारे ढिसाळ कारभार सुरू असूनही ते का लक्ष देत नाहीत? असा प्रश्नही येथील नागरिक करू लागले आहेत.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत