अखेर "त्या" चौकाचे भाग्य उजळले; सामाजिक कार्यकर्ता संघटनेने मानले आभार महात्मा गांधी चौक नाव देण्याची केली मागणी
अखेर "त्या" चौकाचे भाग्य उजळले; सामाजिक कार्यकर्ता संघटनेने मानले आभार
महात्मा गांधी चौक नाव देण्याची केली मागणी
बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील जिल्हा कारागृहामागे तसेच माने कॉम्प्लेक्स समोरील चौकाचे भाग्य उजळले असून या चौकाला महात्मा गांधी चौक नाव द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता संघटनेकडून करण्यात आली आहे.
या चौकात काही वर्षांपूर्वी महात्मा गांधींचा संदेश देणाऱ्या तीन माकडांची प्रतिकृती बसविण्यात आली होती. साधारण चार वर्षांपूर्वी अज्ञात इसमाने या तीन पैकी एका माकडाची प्रतिकृती तोडून टाकली होती. ही बाब मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी याविषयी प्रसिद्धी माध्यमाद्वारे जिल्हा प्रशासन आणि बीड नगर परिषदेला उद्देशून नासधूस करण्यात आलेल्या माकडाची नवीन प्रतिकृती पूर्ववत बसवावी अशी मागणी केली होती तसेच 'बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत कहो' असा महात्मा गांधीजींचा मोलाचा संदेश देणाऱ्या या चौकातील माकडांची नवीन प्रतिकृती पूर्ववत बसवून येथे मर्क्युरी लाइट्स लावण्यात यावे. सीसीटीव्ही कॅमेरे लावावे आणि या चौकाला महात्मा गांधी चौक असे नाव देण्यात यावे याकरिता सामाजिक कार्यकर्ता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय तांदळे, धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, माजी सैनिक अशोक येडे, शेख युनूस, शेख सादिक, आजम खान, रामधन जमाले, ज्येष्ठ नागरिक कोळेकर साहेब, शेख मुबीन, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे आणि या प्रश्नाकडे लेखणीच्या माध्यमातून लक्ष वेधणारे मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी लागोपाठ दोन वर्ष महात्मा गांधी यांच्या २ ऑक्टोबर या जयंती दिनी या चौकात लक्षवेधी आंदोलन ही केले होते. याची दखल घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी या चौकात माकडांच्या नवीन प्रतिकृतीसह सीसीटीव्ही कॅमेरे, पथदिवे लावण्यात यावे असे बीड नगर परिषद मुख्याधिकारी यांना आदेशित केले होते. याची दखल घेऊन विद्यमान मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी तातडीने पाऊल उचलले आणि नासधूस करण्यात आलेल्या माकडांच्या प्रतिकृती हटवून महात्मा गांधीजींच्या जयंतीदिनी म्हणजेच ०२ ऑक्टोबर २०२४ रोजी माकडांच्या नवीन प्रतिकृती बसविल्या. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरेही लावले आणि नुकतेच आता सोलार प्लेट तसेच पथदिवे ही लावल्याने या चौकाचे सुशोभीकरण चांगले झाले आहे. आता फक्त या चौकाला शासन-प्रशासन दरबारी महात्मा गांधी चौक असे नाव द्यायचे बाकी आहे. एवढे एक कार्य बीड नगर परिषदेसह जिल्हा प्रशासनाने केले की हा चौक परिपूर्ण होईल. तसेच या चौकाची ओळखही महात्मा गांधी चौक म्हणून होईल. याकरिता आता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे, रमेशराव गंगाधरे आणि मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ हे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे या चौकात पाहणी केल्यानंतर दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे. शिवाय उशिराने का होईना बीड नगर परिषद च्या विद्यमान मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी या चौकाचे सुशोभीकरण केल्याने तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी याकरिता आदेशित केले होते म्हणून दोन्ही महिला अधिकाऱ्यांचे हृदयी आभार सुद्धा व्यक्त केले आहे.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा