Breaking News

*गलथान नगरपालिका, षंढ जनता?*


 *गलथान नगरपालिका, षंढ जनता?*

नगर पालिका कधी जागी होणार? नगरपालिका डोळ्यावरचे झापड कधी उघडणार? नगर पालिकेचा गलथाण कारभार कधी थांबणार?

हो मला हेच म्हणायचं की, नगरपालिकेचा गलथाण कारभार कधी बंद होणार? नगरपालिकेला कधी कळणार की, बीड मध्ये जागोजागी कचरा कुंडी ची आवश्यकता आहे. नगरपालिकाने डोळ्याला झापडे लावले असतील तर ती  जरा उघडा आणि तुम्हाला जाणूनबुजून नसेल उघडायची तर आम्ही तयारच आहोत तुमची झापडं उघडायला. आपला कचरा सर्व  कचरा कुंडीत टाकावा अशी जनजागृती करा. काही तरी लोकांना दंड ठेवा. कचऱ्यामुळेच बीड शहरात घाणीचे साम्राज्य झालं आहे. थोडक्यात असताना पालिकेने केलं असतं तर बीडमध्ये एवढी घाण पसरली नसती. एक गल्ली  एक कचरा कुंडी, एक कॉलनी एक कचरा कुंडी.

या सूत्रांची अंमलबजावणी केली असती तर आज एवढी घाण पसरली नसती. नगरपालिकेचे महत्वाचे काम काय असते तर शहरा मध्ये स्वच्छता ठेवणे. पाण्याचा प्रश्न सोडवणे. इतर बाकी कामे आहेतच. शहरात काहीच स्वच्छता नाही. मग मला एक प्रश्न पडला की, शहरासाठी आलेला निधी जातो कुठे? शहर स्वच्छ होत नाही. नळांना पाणी व्यवस्थित नाही. शहरात 50 ठिकाणी बॅनर लागतात. त्याला परवानगी दिली तर ठीक नसेल परवानगी तर ते बाकी बॅनर कोणी लावले आणि कसे? हा प्रश्नच आहेच.

शहरातील नाल्या व्यवस्थित नाही. ज्या आहेत तिथे कचरा अडकलेला असतो. ट्रॅफिक पोलीस नीट काम करत नाही. त्या मुळे होणारे अपघात आणि मरणाऱ्यांची संख्या जास्त होत चालली आहे. हे सगळं नगरपालिकेचं काम असताना शहराची अवस्था काय आहे. आलेला निधी तिथेच जिरतो का? जिरत नसेल तर पैसा कुठे आहे? थोडा दिखाऊपणा करून थोडा पैसा कामा साठी लावायचा आणि बाकी पैसा कुठे आहे. याला लोक हि कारणीभूत आहेत. कारण लोकांना प्रश्नच पडत नाही. जनसामान्य माणसे तसेच मुस्कट दाबून राहतात. लोकहो, विचारा पालिकेला विकासाचा पैसा कुठे आहे? मग बघा काय काय होत ते. समाजाला जोपर्यंत प्रश्नच पडत नाही तोपर्यंत विकास होणार नाही. लोकांच्या वतीने मी विचारते , आलेला निधीचे काय होते? नगरपालिका कधी जागी होणार? आलेला निधी असाच गायब होणार का? मला आता मीडिया ला सुद्धा विचारायचं आहे की, तुम्ही लोक मूग गिळून गप्प का? असे हि असेल कदाचित थोडाफार निधी मधील पैसा तुमच्या पर्यंतही पोहचला असेल.

निवडणूक आली की तुम्ही लोक एवढे जागे होतात की विचारायची सोय नाही. दिवसरात्र त्याचं बातम्या. मग इकडे एखादी चुकून बातमी टाकली की बस मग शांत? तुम्ही हि गोष्ट मग मनावर का घेत नाही? याचं उत्तर मीडियाने द्यावे. कारण मीडिया खूप जलद गतीने काम करतो तसेच. जनजागृती चे हि काम प्रभावित होते. असे असूनही मीडिया गप्प का?

लोकंहो, तुम्हीच आता जागे व्हा. तुमचे प्रश्न तुम्हीच सोडवा. तुम्हीच तुम्हला न्याय मिळवून द्या, जागे व्हा असे झोपून कसे चालेल? तुम्ही जागे झालात तर नगरपालिका जागी होईल. रोज उठून पाणी, वीज या गोष्टी पण सोडवता येत नसेल तर लोकंहो तुम्ही षंड आहात का? असेच म्हणावे लागेल. नगरपालिकेला अजून एक विचारायचे आहे की, स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष होऊन गेले तुम्ही अजूनही बेसिक प्रश्न ही सोडवले नाही? तुम्हाला आजच्या काळत ही या प्रश्नावर भाकरी भाजून घ्यायची आहे  का? हेच प्रश्न अजून हि तसेच ठेऊन जनतेला आहे तसे ताटकळत ठेवायचे अन वर्षाहून वर्षे निधी जिरवायचा आहे का? असे असेल तर आम्हाला आवाज उठवावा लागेल आणि आवाज आता मुबंईचं काय दिल्ली पर्यंत जाईल इतका कणखर आहे. उठा जागे व्हा.

*लेखन - रुपाली देशपांडे*

बीड.

*संपर्क - 8888955539*

==================================

*एस.एम.न्युज़ च्या सेवा*

१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.

२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.

३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार) 

आसेफ़नगर, बीड.

संपर्क - *9021 02 3121*

*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*

दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत

शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत

*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत