सौरकृषीपंप अर्जदारांनो, आपला लाभार्थी हिस्सा त्वरीत भरा - महावितरण अन्यथा अर्ज रद्द होवू शकतो
सौरकृषीपंप अर्जदारांनो, आपला लाभार्थी हिस्सा त्वरीत भरा - महावितरण
अन्यथा अर्ज रद्द होवू शकतो
बीड (एस.एम.न्युज़) - शेतकऱ्यांचे दिवसा विजेचे स्वप्न पुर्णत्चास नेण्यासाठी महावितरण कंपनी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेच्या अंमलबजावणीसाठी जलदगतीने कामाला लागली आहे. मात्र अद्यापही गेल्या अनेक महिन्यांपासून कोटेशन देवूनही कुसूम-ब योजनेतील अर्जदार शेतकरी आपला लाभर्थी हिस्सा भरत नसल्याचे आढळून आले आहे. लातूर परिमंडळातील ३९ हजार ६३४ शेतकऱ्यांना महावितरणने कोटेशन पाठवले आहेत. दोन महिन्याच्यावर कालावधी ओलांडला तरीही लाभार्थी रक्कम भरली नसल्याचे दिसून येत आहे. अर्जदारांची वाढती संख्या पाहता अर्जदारांनी आपल्या वाट्याची रक्कम त्वरीत न भरल्यास अर्ज रद्द होवू शकतो. त्यामुळे कोटेशन मिळालेल्या शेतकऱ्यांनी त्वरीत रक्कम भरावी असे आवाहन महावितरणच्या लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शेतकऱ्यांची पेड पेंडिंगची समस्या सोडविण्यासाठी ही योजना राबविण्यासाठी आग्रह आहे. शेतकऱ्यांना सिंचनाच्या बाबतीत स्वतंत्र करणारी आणि त्यांना दिवसा सिंचनाची सुविधा उपलब्ध करणारी ही योजना प्राधान्याने राबविण्यासाठी महावितरणने कंबर कसली आहे.
लातूर, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांचा समावेश असलेल्या लातूर परिमंडळात कुसूम-ब योजनेमधील ६८ हजार ३०९ प्राप्त अर्जदारांपैकी ३९ हजार ६३४ अर्जदार शेतकऱ्यांना कोटेशन पाठवण्यात आले आहेत. यामध्ये बीड जिल्हयातील २१ हजार १९६ धाराशिव जिल्ह्यातील १० हजार १०७ आणि लातूर जिल्ह्यातील ८ हजार ३३१ शेतकऱ्यांचा समावेश आहे. मात्र अद्यापही यापैकी एकाही शेतकऱ्याने आपल्या लाभार्थी हिस्स्याची रक्कम भरलेली नाही. मागेल त्याला सौरकृषीपंप योजनेसाठी मोठ्याप्रमाणावर अर्जदार शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोटेशन पाठवूनही अद्याप लाभार्थी वाटा न भरल्यामुळे अर्ज रद्द करण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार असून जे शेतकरी त्वरीत लाभार्थी हिस्सा भरतील त्यांनाच प्राधान्याने सौरकृषीपंपांचे वाटप केले जाणार आहे. असे लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता यांनी सांगितले आहे. त्यामुळे कोटेशन प्राप्त शेतकऱ्यांनी विनाविलंब कोटेशनचा भरणा करावा.
राज्य सरकारने राज्यात साडेदहा लाख सौर कृषी पंप बसविण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. दहा लाखापेक्षा जास्त पंप बसविण्यात येणार असल्याने कृषी पंपासाठी पैसे भरून वीज कनेक्शनची प्रतीक्षा करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा पेड पेंडिंगचा प्रश्न सुटणार आहे.
या योजनेत शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कुसुम योजनेत केंद्र सरकारकडून ३० टक्के तर राज्य सरकारकडून ६० टक्के अनुदान मिळते. त्यामुळे केवळ दहा टक्के रक्कम भरून सिंचनासाठी कृषी पंपासह संपूर्ण संच मिळतो. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना केवळ ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा