आ. संदीप क्षीरसागर यांनी घेतली एस.एम.युसूफ़ यांच्या खुल्या पत्राची दखल! हिवाळी अधिवेशनात बिंदुसरा नदीवरील नियोजित पुलाचा मुद्दा मांडला
आ. संदीप क्षीरसागर यांनी घेतली एस.एम.युसूफ़ यांच्या खुल्या पत्राची दखल!
हिवाळी अधिवेशनात बिंदुसरा नदीवरील नियोजित पुलाचा मुद्दा मांडला
नागपूर (एस.एम.न्युज़) - येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात बीड विधानसभा मतदार संघातून लागोपाठ दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले संदीप क्षीरसागर यांनी बीड शहराच्या मधोमध वाहणाऱ्या बिंदुसरा नदीवरील खासबाग-मोमीनपुरा जोडणाऱ्या नियोजित पुलाचा मुद्दा मांडला. त्यांनी मांडलेल्या या लक्षवेधी मुद्द्यामुळे एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक एस.एम.युसूफ़ यांनी काही दिवसांपूर्वी त्यांना प्रसिद्धी माध्यमाद्वारे लिहिलेल्या खुल्या पत्राची दखल घेतल्याचे दिसून आले आहे.
विशेष म्हणजे आमदार म्हणून निवडून आल्यावर काही दिवसातच एस.एम.युसूफ़ यांनी त्यांच्यासमोर खुल्या पत्राद्वारे ११ मुद्दे मांडले होते. ज्यावर तातडीने विकास कामे होणे आवश्यक आहे. यापैकी बिंदुसरा नदीवरील पुलाचा मुद्दा हा कळीचा मुद्दा म्हणून गेल्या काही वर्षात त्यांनी हा पुल निर्माण व्हावा याकरिता सय्यद इलयास, धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, शेख युनूस चऱ्हाटकर, शेख मुबीन, मुहम्मद मोईजोद्दीन, संदीप पाटील, सय्यद आबेद, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे यांच्यासोबत घेऊन आतापर्यंत दोनदा पावसाळ्याच्या हंगामात डुबकी लगाव आंदोलन सुद्धा केले आहे. यामुळे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आल्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर यांनी या पुलासाठी बरीच धावपळ केली होती परंतु या पुलाचे काम मात्र अजूनही प्रत्यक्षात सुरू झालेले नाही. आता सुद्धा नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात त्यांनी हा मुद्दा मांडून राज्य शासनाकडे खासबाग-मोमीनपुरा हे दोन मोठे परिसर एक दुसऱ्यांना जोडण्यासाठी बिंदुसरा नदीवरील पूल तातडीने निर्माण करण्यात यावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. याबद्दल या पुलासाठी गेल्या चार वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत असलेले एस.एम.युसूफ़, सय्यद इलयास यांच्यासह सर्व आंदोलनकर्त्यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांचे आभार व्यक्त केले असून या पुलाच्या निर्माणासाठी आपल्या आमदारकीची संपूर्ण ताकद लावा. आम्ही सुद्धा आपल्या खांद्याला खांदा लावून संघर्ष करण्यासाठी तयार आहोत असेही म्हटले आहे.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा