अमित शहा, राजीनामा द्या! - ॲड. उषाताई दराडे
*अमित शहा, राजीनामा द्या!*
तुम्हास नमस्कार कसा करावा शेवटी तुमच्या पोटातले ओठात आले. आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी एवढी घृणा का आहे. संसदेत म्हणालात, आता फॅशन आली आहे, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर म्हणण्याची असंही म्हणालात की, इतक्यावेळा ईश्वराचे नाव घेतले असते तर सात जन्मापर्यंत स्वर्ग मिळाला असता. तुमच्या या वक्तव्याचा मी निषेध करते व धिक्कार करते. अमित शहा, तुम्हास डॉ. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर माहित आहेत का? समजलेत का ते तुम्हाला. अहो, त्यांनी जगातल्या घटनांचा अभ्यास करुन देशाला घटना दिली. त्या घटनेच्या चौकटीत राहुन तुम्ही निवडणुक लढवली व खासदार झालात. आता गृहमंत्री आहात. घटना वाचली का तुम्ही कधी? वाचुही नका. तुम्हास समजणार नाही. तडीपार ना तुम्ही. लायकी नसताना गृहमंत्री झाला. पंतप्रधान आणि तुम्ही सारखेच.
आम्हाला सात जन्म स्वर्ग नको आहे. आम्हाला लोकशाही हवी आहे. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य हवे आहेत. नोकऱ्या हव्या आहेत. सामाजिक समता हवी आहे. देशाची अखंडता, सामाजिक एकात्मता हवी आहे. धर्मनिरपेक्षता हवी आहे. तुम्ही तर हिंदु खतर में है म्हणता. पुन्हा एक है तो सेफ है म्हणता. देश सुरक्षीत हाथो में है म्हणता. हिम्मत असेल तर मणिपुरला जा, बघा शांतता प्रस्थापित करता येते का ? तुम्हाला सात जन्माचा स्वर्ग मिळेल.
जमले तर बांग्लादेशात जे हिंदुंवर अन्याय होत आहेत, त्यासाठी काही करता आले तर बघा. म्हणे तुमच्या विश्वगुरुने युक्रेनचे युध्द संपवले. मणिपुरसाठी काही करता आले तर बघा, पण तुम्ही करणार नाहीत.
तुम्ही संसदेत असेही म्हणालात की, अल्पसंख्यांकांना आरक्षण देण्याची धडपड विरोधी करत आहेत. नरेंद्र मोदींचा दर्गाह मध्ये चादर चढवताना फोटो व्हायरल झाला आहे. मग हे नाटक कशासाठी?
घटना बदलायला निघालेले तुम्ही आता घटनेपुढे मान तुकवता. किती नाटके करणार? दररोज लोकशाही पायदळी तुडवताय. राजकीय पक्षांची तोडफोड करणे, नेत्यांची घरे फोडणे, याला काय म्हणायचे?
एक देश एक निवडणुक हे विधेयक तुम्ही आणले आहे. हुकूमशाहीच्या दिशेने तुमची उघड वाटचाल सुरु आहे. बाकी हे सगळे तुम्हाला सांगुन काय उपयोग म्हणा! पालथ्या घड्यावर पाणी!! तुम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर काय समजणार म्हणा. डॉ. आंबेडकर भारतरत्न, तुम्ही तडीपार!
अमित शहा तुम्ही समजता काय स्वतःला. तुम्ही फक्त डॉ. बाबासाहेबांचा नाही तर देशाचा अपमान केला आहे. जराही तुमच्या ........... शिल्लक असेल तर देशाची माफी मागा, गृहमंत्री पदाचा राजीनामा द्या.!
*लेखन - ॲडव्होकेट उषाताई दराडे*
माजी आमदार, बीड.
संपर्क - 9011521111
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा