शहिंशाहवली दर्गाह तलाव परिसरालगतचे नागरिक भोगताहेत नरक यातना मौलाना आझाद युवा मंच ने पाहणी करून दिला आंदोलनाचा इशारा
शहिंशाहवली दर्गाह तलाव परिसरालगतचे नागरिक भोगताहेत नरक यातना
मौलाना आझाद युवा मंच ने पाहणी करून दिला आंदोलनाचा इशारा
बीड (प्रतिनिधी) - शहरातील शहिंशाहवली दर्गाह तलाव परिसरालगत ना रस्ते, ना नाल्या. संपूर्ण वस्तीतील घाण व सांडपाणी रस्त्यांवरून वाहत असल्याने येथील नागरिक अक्षरशः नरक यातना भोगत असल्याची माहिती मौलाना आझाद युवा मंच चे बीड जिल्हाध्यक्ष अरफात खान, सामाजिक कार्यकर्ते तथा भावी नगरसेवक अख्तर पेंटर आणि सय्यद सलमान यांनी पाहणी करून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, शहिंशाहवली दर्गाह तलाव परिसरालगतचे नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून येथे येता-जाता गलीच्छतेला तोंड देत अक्षरशः नरक यातना भोगत आहेत. या अवस्थेची माहिती अरफात खान, अख्तर पेंटर, सय्यद सलमान यांना मिळाल्यानंतर त्यांनी अरबाज शेख, सोहेल शेख यांच्यासह मौलाना आझाद युवा मंच चे अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह तेथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यादरम्यान या परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. येथील महिला पुरुषांसह आबालवृद्ध देखील येथे राहताना सोसाव्या लागत असलेल्या हाल अपेष्टा विषद केल्या. हे ऐकून या सर्वांचे हृदय हेलावले आणि अरफात खान यांनी येथील रहिवाशांना शब्द दिला की, जोपर्यंत या परिसरात चांगले रस्ते आणि नाल्यांचे निर्माण कार्य प्रत्यक्षात सुरू होत नाही, तोपर्यंत या भागासाठी बीड नगरपरिषद आणि जिल्हा प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करू तसेच लवकरच बीड नगरपरिषद सह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने मौलाना आझाद युवा मंच कडून उग्र आंदोलन करू असे म्हणत आंदोलनाचा इशारा दिला आहे. शिवाय लवकरच बीड नगरपरिषद मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना भेटून येथील समस्या आणि प्रचंड त्रास व नरक यातनेची दखल घेत विकास कामे करायला लावू असेही म्हटले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा