Breaking News

मुन्नी बदनाम हुई मुळे झंडू बाम आकाशाला भिडले नशाखोर वेदनेऐवजी नशेसाठी वापरू लागले


मुन्नी बदनाम हुई मुळे झंडू बाम आकाशाला भिडले

नशाखोर वेदनेऐवजी नशेसाठी वापरू लागले

बीड (एस.एम.न्युज़) - सन २०१० साली सुपरस्टार सलमान खान चा दबंग हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात एका गाण्यात त्याच्यासोबत त्याची तत्कालीन भावजय आणि अरबाज खानची बायको असलेली मलाइका अरोरा वर चित्रीत केलेले मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिये, मै झंडू बाम हुई डार्लिंग तेरे लिये असे एक गाणे होते. या गाण्यानंतर वेदना शामक झंडू बाम असा काही लोकप्रिय झाला आणि त्याने बाजारपेठेत अशी काही उसळी घेतली की, विचारता सोय नाही. सध्या हिवाळा सुरू आहे. या ऋतुमानात मोठ्या प्रमाणात थंडी वाढत असल्याने अनेकांना सर्दी, पडसे, डोकेदुखी इत्यादी आजार होतात. म्हणून अनेक जण हे आजार झाल्यानंतर ऍलोपॅथी औषधी खाऊन रोग बरे करण्याऐवजी झंडू बामचा वापर करतात. मला आठवते मुन्नी बदनाम हुई या गाण्याअगोदर झंडू बाम हे वेदना शामक मलम २० ग्राम च्या डबी मध्ये मिळायचे. तेही परवडतील अशा दरात. परंतु जसेच याचे नाव दबंग या चित्रपटातील गाण्यात वापरण्यात आले, तेव्हापासून या झंडू बाम चे दर दणदणीत वाढत गेले. ते आजमीतिला २० ग्रॅम ऐवजी फक्त ०८ मिली च्या पॅक मध्ये मिळू लागले आहे आणि त्याची किंमत ४५ रुपये झाली आहे. म्हणजेच १ मिली झंडू बाम साठी ५ रुपयाच्या वर दर आकारले जात आहे. हा झंडू बाम एवढा महाग कसा झाला? तर बहुतेक दबंग या चित्रपटात मुन्नी बदनाम हुई या गाण्यामध्ये त्याचे नाव वापरून त्याची जी प्रसिद्धी करण्यात आली तेव्हा या चित्रपटाच्या निर्मात्याला झंडू बाम वाल्यांनी चांगली मोठी रक्कम दिली असेल आणि त्याची वसुली आता टोल टॅक्स सारखी जनतेकडून करण्यात येत असल्याचे वाटते. तसेच काही वर्षांपूर्वीपर्यंत हा झंडू बाम फक्त वेदना शमन करण्यासाठी वापरला जायचा, तिथे आता काही अल्पवयीन तर काही तरुण मुले त्याचा वापर नशाखोरीसाठी करू लागले आहेत. अशी मुले हा झंडू बाम घेऊन ब्रेड किंवा पाव ला लावून चक्क खाऊ लागली आहेत. यामुळे म्हणे त्यांना चांगली झिंग चढते आणि दारू सारखा वास येत नसल्याने कुणाला त्यांनी नशा केल्याचा संशय देखील येत नाही. अशा प्रकारे वेदनाशामक झंडू बाम बघता बघता नशाखोरी साठी सुद्धा वापरला जात असल्याने तसेच मुन्नी बदनाम हुईची झिंग आहेच. यामुळे की काय याचे दर आता आकाशाला भिडले आहेत.

==================================

*एस.एम.न्युज़ च्या सेवा*

१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.

२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.

३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार) 

आसेफ़नगर, बीड.

संपर्क - *9021 02 3121*

*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*

दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत

शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत

*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत