बहादुर शाह जफर उर्दू हायस्कुलमध्ये अल्पसंख्यांक दिन उत्साहात साजरा
बहादुर शाह जफर उर्दू हायस्कुलमध्ये अल्पसंख्यांक दिन उत्साहात साजरा
बीड (एस.एम.न्युज़) - तालुक्यातील नेकनूर येथे बहादुर शाह जफर उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दिनांक १८ डिसेंबर रोजी अल्पसंख्यांक दिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
जिजाऊ ग्रामीण विकास प्रतिष्ठान व महिला सेवाभावी संस्थान धाणेगाव संचालित बहादूर शाह जफर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये शाळेचे प्राचार्य पठाण रिजवान खान यांनी विविध उपक्रम राबविले. यात सर्व शिक्षकवृंद तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. अल्पसंख्यांक हक्क दिन का साजरा करण्यात येतो? त्या मागची कारणे काय? याचे महत्व काय? याविषयी उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. अल्पसंख्यांकांचे हक्क आणि त्यामागील पार्श्वभुमी याची इत्यंभूत माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांच्या सामुहिक वाचनाचा उपक्रम ही घेण्यात आला. तसेच सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयावरील माहितीपूर्ण पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. यावेळी प्राचार्य पठाण रिजवान खान, सहशिक्षक बारी सर, फरजाना बाजी, शातरीन बाजी, इम्रान आफ्रीदी, मुनवर सर, शाहीन बाजी, बन्सी सर, इस्माईल सर, पठाण शगुफ्ता बाजी, इम्रान जाफर सर, सना बाजी यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना वाचनाची गोडीही लागावी याकरिता वाचनाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा