जि.प.मा.शा. पात्रुड येथे गणित दिवस उत्साहात साजरा; शैक्षणिक प्रदर्शनीचे आयोजन
जि.प.मा.शा. पात्रुड येथे गणित दिवस उत्साहात साजरा; शैक्षणिक प्रदर्शनीचे आयोजन
पात्रुड (एस.एम.न्युज़) - जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात असलेल्या जि.प.मा.शा.पात्रुड येथे दिनांक २३ डिसेंबर रोजी गणित दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध शैक्षणिक मॉडेल्सची प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात शाळा समितीसह मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
गणेश दिनानिमित्ताने ठेवण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षणे म्हणजे विद्यार्थ्यांनी सादर केलेली नाविन्यपूर्ण मॉडेल्स आणि गणिताचे विविध पैलू स्पष्ट करणाऱ्या उपक्रमांची मांडणी होती. शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षकांनी आणि समिती सदस्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि शैक्षणिक गुणवत्तेसह आवड वाढत असल्याचे मत व्यक्त केले.
हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी शाळा समितीचे अध्यक्ष जुबेर मोमीन, समितीचे सदस्य शेख जब्बार, मोमीन मोईनुद्दीन, शेख फेरोज, मोमीन मोइज, समीयोद्दीन इनामदार, रियाज सय्यद, शिक्षकवृंदांनी परिश्रम घेतले. सर्वांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांच्या समन्वयामुळे प्रदर्शनीचे आयोजन प्रभावीपणे पार पडले.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा