Breaking News

स्व. संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी मूक मोर्चात लाखोंच्या संख्येने सामील व्हा


स्व. संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी मूक मोर्चात लाखोंच्या संख्येने सामील व्हा

बीड (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच स्व. संतोष देशमुख यांची निघृण हत्या करणाऱ्या क्रूरकर्त्यांना तातडीने अटक करून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी २८ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून काळे कपडे, काळे झेंडे, आंधळकोट मूक मोर्चा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. यात नागरिकांनी लाखोंच्या संख्येने सहभागघ व्हावे असे आवाहन मुस्लिम पक्ष शिष्टमंडळाने केले आहे. यात मुस्लिम समाजानेही हजारोंच्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन माजी सभापती जलील पठाण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा नेते शेख अखील  भाई, माजी उपाध्यक्ष नसीम भाई इनामदार, माजी उपाध्यक्ष शाकेर भाई, अय्यूब खान, शेख अय्युब शेख रहीम यांनी आवाहन केले आहे.
याविषयी थोडक्यात वृत्त असे की, सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आला. बीडचे बिहार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्व. संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी बीडमध्ये सर्वपक्षीय, सर्वजातीय, सर्वधर्मीय मोर्चा निघणार आहे. स्व. संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी  सोमवारी सर्वपक्षीय, सर्व समाज आणि संघटनांची एकत्र बैठक बीड शहरातील आशीर्वाद लॉन्स येथे आयोजित करण्यात आली होती. यात सर्वपक्षीय बैठकीत दिनांक २८ रोजी शनिवारी सकाळी ठीक ११:०० अकरा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत  मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मुख्य मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने या मोर्चामध्ये सहभाग नोंदवावा. असे आवाहन मुस्लिम समाजातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटातील जलील पठाण, शेख अखील, नसीम इनामदार, शेख शाकेर, अफसर खान, शेख अय्युब, शेख रहीम आदींनी मुक मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन केले आहे.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत ch
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत