शिक्षण हे माणसाला माणूस म्हणून घडविण्याचे सर्वात प्रभावी माध्यम विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण आत्मसात करावे - अब्दुल्ला जावेद
बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील सर सय्यद अहेमद शाळेत विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या प्रोत्साहनपर कार्यक्रमात बोलताना इस्लामिक स्कॉलर अब्दुल्ला जावेद यांनी वरील उद्गार काढले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर सय्यद अहेमद शाळेचे सचिव वकील सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, तंज़ीम तरक़्क़ी उर्दू चे बीड जिल्हाध्यक्ष तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील उर्दू विभागाचे अशासकीय सदस्य सय्यद हसीन अख्तर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन रज़ीयोद्दीन सर यांनी केले.
याप्रसंगी बोलताना इस्लामिक स्कॉलर अब्दुल्ला जावेद म्हणाले की, शिक्षण हे माणसाला माणूस म्हणून घडविण्याचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण आत्मसात करावे. जे विद्यार्थी चांगले शिक्षण आत्मसात करतात ते जीवनात यशस्वी होतात. यावेळी शेख अफ़सर सर शेख आदिल सर यांच्यासह शेकडोंच्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा