Breaking News

"मत" हे "दान" नसून तो तुमचा "अधिकार" आहे "तेव्हा मतदारांनो, मताधिकारासाठी घराबाहेर पडा"

बीड (एस.एम.न्युज़) - ज्याला आपण सर्वजण मतदान म्हणून संबोधतो प्रत्यक्षात आपल्या भारतीय संविधानात त्यास संविधान रचयिते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी "मताधिकार" असे म्हटले आहे. तेव्हा मतदानासाठी नव्हे तर आपला मताधिकाराचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडा आणि गतीने मताधिकार बजवा.

आज सकाळी 07:00 वाजेपासून जिल्हाभरातील मतदान केंद्रावर मतदानास सुरुवात झाली आहे. मी सकाळी 09:00 वाजता मतदान केंद्रावर जाऊन 09:20 ला मतदान केले. त्या मतदान केंद्रावर एकूण 900 मतदान आहे. त्यातून 02 तास 20 मिनिटात फक्त 90 मतदारांनी मतदान केले. म्हणजे मतदान केंद्रावरील एकूण मतदाराच्या फक्त 10 टक्के मतदारांनीच आपल्या मताधिकाराचा वापर केला. जवळपास अडीच तासाच्या वेळात फक्त 10 टक्के मतदान ही गती अत्यंत शोचनीय आहे. अशीच गती राहिली तर संध्याकाळी 05:00 वाजेपर्यंत 50 ते 60 टक्के ही मतदान होईल की नाही? असा प्रश्न पडत आहे. तेव्हा मतदारांनो घराबाहेर पडा आणि मतदान केंद्रांवर जाऊन आपल्या मताधिकाराचा हक्क बजवा.
*- एस.एम.युसूफ़ पत्रकार, बीड.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत