Breaking News

अनंतभाऊ कडून प्रेमाची अनमोल भेट! दहा वर्षात मनापासून प्रेम करणारी माणसं कमावली!


बीड (एस.एम.न्युज़) - साधारण दोन-तीन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर मी,

"जबसे मौत को ध्यान मे रखकर जी रहा हूँ
ज़िंदगी बड़ी सुकून से कट रही है।"


या दोन ओळी लिहिल्या होत्या. त्या माझ्या जिवाभावाचे मित्र, "चला थोडंसं वाचूया" या मी ग्रुप ॲडमिन असलेल्या व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य आणि ग्रुपच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्याचे सुचविणारे, वृक्षारोपणात जातीने सहभाग नोंदविणारे, हळव्या मनाचे कवी असलेले अनंत भाऊ सूतनासे यांना मनापासून आवडल्या आणि त्यांनी या दोन ओळींसोबत त्यांनीच काढलेला माझा हा फोटो अटॅच करून पाठविला.
गेल्या दहा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात मुक्तपत्रकार म्हणून मी मुक्त छंद वावरत आहे. यामुळे पत्रकारिता क्षेत्रासह अन्य क्षेत्रातही अनेक जण आता बऱ्यापैकी मला ओळखू लागले आहेत. यातील काहींशी जवळचे संबंध निर्माण झाले आहेत. अशापैकी अनेक जण मला प्रश्न विचारतात की, युसूफ़भाई गेल्या दहा वर्षापासून तुम्ही निष्पक्ष, निर्भीड आणि सडेतोड पत्रकारिता करीत आहात, तरीसुद्धा अजून तुम्ही पैसा-अडका, जमीन-जुमला, घर-दार, गाडी-घोडे कमवल्याचे दिसून येत नाही.
यावर मी स्मित हास्य करून आकाशाकडे पाहतो आणि म्हणतो, 'आपण चांगले काम करत राहणे आपल्या हातात आहे. आपल्याला काही मिळणे किंवा ते देणे वर बसलेल्या अल्लाह च्या हाती आहे. जोपर्यंत अल्लाह ची मर्जी नसेल तोपर्यंत आपण वर उल्लेख केलेल्या पैकी काहीही मिळवू शकत नाही.'
गीतेतही म्हटले आहे ना,
"करम किये जा फल की इच्छा मत कर ऐ इंसान
जैसे करम करेगा वैसे फल देगा भगवान"
तेव्हा अल्लाह ने लिहिले नशिबात तर मिळेलच. नसेल लिहिले तर कितीही हात पाय मारले तर मिळणार नाही. माझ्या इमानदारी आणि सत्यामुळे भलेही अजून पर्यंत मी पैसा अडका कमवू शकलो नसलो तरी जीवाभावाची, मनस्वी प्रेम करणारी माणसं मात्र भरपूर कमविली आहेत किंबहुना अल्लाह ने ती माझ्यासोबत जोडली आहेत. ही कमाई पैशांपेक्षा खूप मोठी आहे. याचे मूल्य पैशात होऊ शकत नाही. ती अमूल्य आहे.
अनंत भाऊंनी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून माझ्या दोन ओळींसोबत माझा हा फोटो वेळ देऊन बनविला, त्याबद्दल अनंतभाऊ आपले मनस्वी आभार🙏
🙏धन्य❤️वाद🙏
*- एस.एम.युसूफ़ पत्रकार, बीड.*

संपर्क - 9021 02 3121

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत