*डबल "एम" कार्ड हरवणार की गवसणार?*
मोठा गाजावाजा करण्यात आलेला डबल "एम" कार्ड म्हणजेच मराठा आणि मुसलमान किती एकत्र झाला हे 23 तारखेला लागणाऱ्या निकालात दिसून येईलच.
तत्पूर्वी मराठा आणि मुस्लिम समाजाला एकत्रित आणून जिथे मराठा उमेदवार असेल तिथे मुसलमान उभा राहणार नाही आणि जिथे मुसलमान उभा राहील तिथे मराठा उभा राहणार नाही अशा मोठ्या आणा-भाका घेतल्या जात होत्या
त्याला दोन्ही समाजातील काहींनी हरताळ फासला आहे
बीड विधानसभा मतदारसंघात मराठा सरदार मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर प्रतिस्पर्धी म्हणून चर्चेत आलेल्या अनेक मुस्लिम चेहऱ्यांनी आपापले अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतले
मराठा समाजातील अनेकांनी मनोज जरांगे पाटलांचे आवाहन मात्र मोडीत काढले
चर्चेत असलेल्या अनेक मराठा चेहऱ्यांनी आपआपले अपक्ष उमेदवारी अर्ज ठेवून मैदानात शड्डू ठोकले आहे
हे पाहता जिथे मराठा बांधव एकत्र येऊ शकत नाही
तिथे मराठा आणि मुस्लिम एकत्रित येण्याच्या आणा-भाका कशा काय घेतल्या जात होत्या? आणि कोणत्या आधारे?
असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत
आता उभ्या असलेल्या चर्चित मराठा चेहऱ्यांमधून बहुतेक एकही चेहऱ्याला विजयी माला घालण्याची संधी मिळणार नाही!
यांची अवस्था एक ना धड भाराभर चिंध्या आणि तुला न मला घाल कुत्र्याला सारखी होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे
असो!
निवडणूक म्हटले की, असले प्रकार होणारच
आता मराठा आणि मुसलमानांना फक्त 23 तारखे रोजी जाहीर होणाऱ्या निकालात मराठा आणि मुस्लिमेत्तर कोणता उमेदवार निवडणूकित विजयी होऊन आमदार होईल हे दिसून येईलच!
*- एस.एम.युसूफ़ पत्रकार, बीड.*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा