उमेदवारांना फक्त जनतेची मतं हवीत, प्रश्न व समस्या नकोय - एस.एम.युसूफ़ महेदवीया समाजाची एकगठ्ठा मते उमेदवाराला मिळणार नाही!
उमेदवारांना फक्त जनतेची मतं हवीत, प्रश्न व समस्या नकोय - एस.एम.युसूफ़
महेदवीया समाजाची एकगठ्ठा मते उमेदवाराला मिळणार नाही!
बीड (एस.एम.न्युज़) - उमेदवारांना फक्त जनतेची मतं हवीत, प्रश्न व समस्या नकोय हे दिसून आल्याने आता महेदवीया समाजाची एकगठ्ठा मते कोणत्याही एका उमेदवाराला मिळणार नसून ती विभागली जाणार असे महेदवीया समाजाचे विश्वस्त तथा एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक एस.एम.युसूफ़ यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी बीड विधानसभा मतदार संघासाठी येत्या २० नोव्हेंबर २०२४ बुधवार रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने या मतदारसंघात ३१ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या सर्व उमेदवारांना महेदवीया समाजाने प्रसिद्धी माध्यमातून आवाहन केले होते की, बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीवर खासबाग-मोमीनपुरा जोडणारा नियोजित पूल तसेच मोमीनपुरा भागात असलेल्या महेदवीया दायरा कब्रस्तान च्या संरक्षक भिंतीचे बांधकाम करून देण्यासाठी जो उमेदवार पुढे येऊन लिखित देईल त्याच उमेदवाराला महेदवीया समाज एक गठ्ठा मतदान करेल. परंतु ३१ पैकी एकही माई का लाल उमेदवार या दोन्ही आवश्यक कामाकरिता पुढे आला नाही. यामुळे उमेदवारांना फक्त जनतेची मतं हवी आहेत. जनतेचे प्रश्न व समस्या नकोय हे दिसून आले आहे म्हणून आता महेदवीया समाज कोणत्याही एका उमेदवाराला आपल्या समाजाची एक गठ्ठा मते देणार नाही. ज्याला जो उमेदवार चांगला वाटेल तो त्या उमेदवाराला मतदान करेल. यामुळे उमेदवाराला महेदवीया समाजाच्या एक गठ्ठा मतदानाला मुकावे लागणार असल्याचे मत महेदवीया समाजाचे विश्वस्त तथा एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक एस.एम.युसूफ़ यांनी व्यक्त केले आहे.
*विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकाग्रहास्तव आता दररोज १२ तास सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) कार्यक्रम स्थळी येऊन *बातमी* लिहून मिळेल.
*- एस.एम.युसूफ़*(मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*वेळ - सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा