बीड नगर परिषद ची उदासीनता, अकार्यक्षमता पोलीस प्रशासनासाठी ठरतेयं डोकेदुखी! वाटसरू नागरिकांची कोण घेणार काळजी?
बीड नगर परिषद ची उदासीनता, अकार्यक्षमता पोलीस प्रशासनासाठी ठरतेयं डोकेदुखी!
वाटसरू नागरिकांची कोण घेणार काळजी?
बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील जुने एस.पी. ऑफिस कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पोलीस प्रशासनाकडून लावण्यात आलेले सूचनाफलक पाहून बीड नगर परिषद ची उदासीनता, अनास्था, अकार्यक्षमता जशी नजरेत भरत आहे तशीच ही बाब पोलीस प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत असल्याचे ही दिसून येत आहे. मात्र यामुळे वाटसरू नागरिकांची काळजी कोण घेणार? असा प्रश्न या अनुषंगाने उपस्थित केला आहे.
बीड नगर परिषदेची उदासीनता, अनास्था आणि अकार्यक्षमतेमुळे बीड शहराच्या विस्तारानुसार आवश्यक असलेल्या मुतारी जागोजागी निर्माण करणे गरजेचे असताना या महत्त्वाच्या व निकडीच्या बाबीकडे मात्र लक्ष देण्यात येत नाही. याकडे बीड नगर परिषद प्रशासनाचे अक्षम्य असे दुर्लक्ष आहे. यामुळे बशीरगंज चौक ते जिल्हा रुग्णालय या रस्त्यावर असलेल्या जुने एस.पी. ऑफिस येथे जिल्हा रुग्णालयात ये-जा करणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक निकडीच्या वेळी जुने एस.पी. ऑफिस च्या आवारात लघु शंका करीत होते. यामुळे या ठिकाणी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बिंदुसरा निवासस्थानी ये-जा करताना पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुतारीचा उग्रवास येत होता. तसेच गलिच्छता स्पष्ट दिसत होती. यामुळे वैतागून पोलीस अधिकाऱ्यांनी या जागी असलेल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर मोठे सूचनाफलक लावले तसेच या मुतारीचा जाम वैताग आल्याने फक्त एका सूचना फलकावर समाधान न मानता चक्क मुख्य प्रवेशद्वारा बाहेर एक, मध्ये एक आणि अजून थोड्या अंतरावर एक अशा प्रकारे तीन-तीन सूचना फलक लावले. त्यावर येथे लघवी केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल अशी सूचना तीन-तीन फलकावर लावण्याची वेळ पोलीस प्रशासनावर का आली? तर याचे उत्तर आहे, बीड नगर परिषदेची उदासीनता, अनास्था आणि अकार्यक्षमता. बीड नगर परिषदेने आवश्यक संख्येत बीड शहरात जागोजागी मुतारी आणि संडास बांधले असते तर पोलीस प्रशासनावर अशा प्रकारे तीन-तीन सूचनाफलक लावण्याची वेळ आली नसती. निगरगट्ट झालेल्या बीड नगर परिषदेने आता निदान पोलीस प्रशासनाच्या या कारवाईनंतर तरी आपल्या कार्यकर्तव्यात सुधारणा करावी. बीड शहरात आवश्यक तेथे मुतारी व संडासचे निर्माण करावे. जेणेकरून रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना निकडीच्या वेळी त्याचा वापर करता येईल.
महिला वर्गाचाही असतो समावेश
जुने एस.पी. ऑफिसच्या परिसरात लघु शंका करणाऱ्यांमध्ये लहानांपासून वयोवृद्धापर्यंत सर्वांचा समावेश असतो तसेच जिल्हा रुग्णालयात ये-जा करणाऱ्या महिला वर्गाचाही मोठ्या संख्येने समावेश असतो. ही बाब लक्षात घेता बीड नगर परिषदेने या रस्त्यावर मुतारी आणि संडास निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे.
======================
*विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकाग्रहास्तव आता दररोज १२ तास सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) कार्यक्रम स्थळी येऊन *बातमी* लिहून मिळेल.
*- एस.एम.युसूफ़*(मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*वेळ - सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा