... तरच 'त्या' उमेदवाराला पाठिंबा आणि मतदान - महेदवीया समाज उमेदवार पुढे नाही आला तर मतदान विखरेल!
बीड शहरातील मोमीनपुरा भागात गेल्या ४५० वर्षांपासून ऐतिहासिक महेदवीया दायरा कब्रस्तान आहे. पुरातन काळापासून अस्तित्वात असलेल्या या कब्रस्तान च्या दोन्ही रस्त्यांकडील संरक्षक भिंती विपन्नावस्थेत गेल्या आहेत. भिंतींची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने पडझड झालेल्या भिंतीच्या जागेवरून कब्रस्तानात कुत्री, शेळ्या, मेंढ्या, मांजरी मोठ्या संख्येने कब्रस्तानात जाऊन कबरींना मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवीत आहे. कब्रस्तानातील कबरी ची नासधूस थांबविण्याकरिता पडलेल्या भिंती नव्याने बांधणे अत्यंत आवश्यक आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे ४५० वर्षांचा इतिहास असताना महेदवीया समाजाने आजपर्यंत कब्रस्तानसाठी बीड नगर परिषद, आमदार, खासदार किंवा एखाद्या मंत्र्या-संत्र्याकडून कधीही एक छदामाचे काम करून घेतलेले नाही.
ही बाब लक्षात घेऊन महेदवीया समाजाने २३ जानेवारी २०२३ रोजी तत्कालीन आमदार संदीप क्षीरसागर यांना जातीने कब्रस्तानात बोलावून कब्रस्तानाची अवस्था दाखविली होती. त्यांनी पाहणी करून संरक्षक भिंती आमदार फंडातून बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. याला आता ०२ वर्ष होत आली आहेत, तरीही कब्रस्तानची संरक्षक भिंत निर्माण करून देण्याचे कार्य करण्यात आलेले नाही. तसेच बिंदुसरा नदीवरील खासबाग-मोमीनपुरा जोडणाऱ्या नियोजित पुलाचे बांधकाम सुद्धा गेल्या ०३ वर्षात दोनदा डुबकी लगाओ आंदोलन करूनही अजून पर्यंतही पुलाचे काम सुरू झालेले नाही.
म्हणून यावेळी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या उमेदवारांपैकी जो कोणी उमेदवार ही दोन्ही कामे करून देण्याचे लिखित देईल, त्या उमेदवाराला महेदवीया समाज जाहीर पाठिंबा घोषित करून मतदान ही करेल जर उमेदवार पुढे नाही आला तर मतदान विखरले जाईल.
असे प्रतिपादन महेदवीया समाजाचे विश्वस्त तथा एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक एस.एम.युसूफ़ यांच्यासह मुहम्मद इस्हाक़, मुहम्मद अब्दुल रऊफ़, मुहम्मद शाह शरीफ़, मुहम्मद इक़बाल, मुहम्मद अन्वर, मुहम्मद नवाज़, मुहम्मद अब्दुल गफ़्फ़ार, मुहम्मद बदर, अब्दुल क़दीर खान, मुहम्मद मुसा, मुहम्मद इसा, मुहम्मद इब्राहिम, शेख नसीर, शेख वसीफ़, शेख हनीफ़, मुहम्मद फ़ताउद्दीन, मुहम्मद नुरोद्दीन, मुहम्मद एजाज़, मुहम्मद अफ़रोज़, मुहम्मद सैफ़, मुहम्मद समी, मुहम्मद फैय्याज़, मुहम्मद मोहसीन, मुहम्मद अशपाक, मुहम्मद जुनैद, मुहम्मद इरशाद, मुहम्मद इमरान, आमीर खान, सोहेल खान यांनी दिलेल्या म्हटले आहे.
*विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकाग्रहास्तव आता दररोज १२ तास सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) कार्यक्रम स्थळी येऊन *बातमी* लिहून मिळेल.
*- एस.एम.युसूफ़*(मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*वेळ - सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा