बागवान समाजाचा कोणत्याही पक्षाला पाठिंबा नाही - जुबेर बागवान
बागवान समाजातील काही स्वयंघोषित कार्यकर्ते स्वतःच्या हितासाठी बागबान समाजासोबत कोणत्याही क्षेत्रात बागबान समाज सोबत उभे न राहिलेले असे लोक 5 ते 10 समाजातील काही वरिष्ठ लोकांची दिशाभूल करून सोबत घेऊन एका पक्षाला पाठिंबा दिल्याचे जाहीर केले आहे. स्वाभिमानाने जगणाऱ्या बागबान समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. बागबान समाज हा सर्व जाती धर्माच्या लोकांसोबत गुण्यागोविंदाने राहत आहे. बागबान समाज कुठल्याही पक्ष किंवा संघटना सोबत नाही. सर्वांसोबत प्रेमाने राहतात. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिला नाही. बागबान समाज हक्काचे मतदान कोणत्या पक्षाला किंवा उमेदवाराला करावे ते बागबान समाजच ठरविणार कोणी बागबान समाज ला शिकवू नये. बीड मध्ये अंदाजे 7 हजार मतदान बागबान समाजाचे आहे. काही मूठभर लोकांनी संबंध नव्हते तरी कोणाला ही विश्वासात न घेता काही छत्रीधारक व स्वयंघोषित नेते लोकांमुळे सर्व बागबान समाजाची बदनामी करणारे प्रकरण उघडकीस आले आहे. सर्व बागबान समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन ठरवून स्पष्ट केले की, बागबान समाज बीड कोणत्याही पक्षा सोबत उभा नाही. सर्वांना आपल्या पसंतीचा उमेदवार निवडून देण्याचा अधिकार आहे. असे आवाहन करण्यात आले. यावेळी मुहम्मद जुबेर, डॉ. साब बागबान, जावेद भाऊ, राजा बागबान, इरफान बागबान, हाजी अय्युब, एकबाल बागबान, हाफिज बागबान सर्व बागबान समाज, सर्व बागबान बिरादरीतील युवक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा