Breaking News

लोकं वृक्ष संवर्धनाऐवजी वृक्षांचे उच्चाटन करू लागले! आपणच आपल्या ऱ्हासास कारणीभूत ठरू - एस.एम.युसूफ़


बीड (एस.एम.न्युज़) - आता लोकंच वृक्ष संवर्धनाऐवजी वृक्षांचे उच्चाटन करू लागल्याचे मत एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक एस.एम.युसूफ़ यांनी व्यक्त केले असून अशीच अवस्था राहिली तर आपणच आपल्या ऱ्हासास कारणीभूत ठरू असे उद्विग्न मत ही व्यक्त केले आहे.
बीड शहरात असलेल्या न्यू सुंदर मेडिकल ते थोरातवाडी आणि जुने एस.पी. ऑफिस ते जिल्हा रुग्णालय रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झाडे लावण्याकरिता चला थोडंसं वाचूया या व्हाट्सअप ग्रुप ने जून चा पूर्ण महिना ग्रुपमध्ये जनजागृती करून वृक्षारोपणासाठी ६ हजार रुपयांची रक्कम जमा केली. त्यातून जुलै महिन्यात १३ कडंबाची तर ३ गुलमोहराची ८ ते १२ फूट उंचीची एकूण १५ झाडे या दोन्ही रस्त्यांच्या दुतर्फा लावली. ही १५ ही झाडे लावल्यानंतर आतापर्यंत चांगली वाढत आहे. असे असताना काही नतदृष्टांची नजर या झाडांना लागली. १५ पैकी २ गुलमोहराची तर ३ कडंबाची झाडे अज्ञातांनी तोडली आहे. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कडंब आणि गुलमोहर ही दोन्ही झाडे गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्या यापैकी कोणतेही जनावर खाणे तर दूर या झाडांजवळ जात सुद्धा नाही. यामुळेच येथे कडंब आणि गुलमोहरांची झाडे लावली होती. परंतु ज्या झाडांना जनावर इजा पोहोचवीत नाही, त्याचा पाला किंवा साल खात नाही, अशा कडंब आणि गुलमोहराच्या झाडांपैकी ३ कडंबांची तर २ गुलमोहराची झाडे काही नतदृष्टांनी तोडून टाकली आहे. आता उर्वरित १० झाडांच्या सुरक्षेसाठी सुरक्षित जाळ्या लावण्याएवढे आर्थिक पाठबळ चला थोडंसं वाचूया या व्हाट्सअप ग्रुप कडे नाही. आणि जनावरांऐवजी लोकंच अशा प्रकारे वृक्षारोपण केलेली झाडे तोडू लागले, वृक्ष संवर्धनाऐवजी वृक्षांचे उच्चाटन करू लागले तर आपणच आपल्या ऱ्हासास कारणीभूत ठरू असे उद्विग्न मत या दोन्ही रस्त्यांवर झाडे लावण्यासाठी चला थोडंसं वाचू या या व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून पुढाकार घेतलेले ग्रुप ॲडमिन तथा एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक एस.एम.युसूफ़ यांनी व्यक्त केले आहे.


============================

*"आता एकाच ठिकाणी सर्व सेवा"*

१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
 
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.

३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

४) कार्यक्रम स्थळी येऊन *बातमी* लिहून मिळेल.

संपर्क -

*एस.एम.युसूफ़* 

रमेशराव गंगाधरे यांची स्वस्त धान्य दुकान क्रमांक ४१, राजुरीवेस जवळ, भीमराज नगर, बीड.
संपर्क क्रमांक - *9021 02 3121*
*वेळ - दुपारी ५ ते रात्री ९ पर्यंत*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत