हिलींग हॅन्ड्स हॉस्पिटल चे प्रज्ञा दीदी, डॉ. देशपांडे, डॉ. वनवे यांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न
बीड (एस.एम.न्युज़) - डॉ. आदित्य कुलथे यांच्या हिलींग हॅन्ड्स हॉस्पिटल चे प्रजापिता ब्रह्मकुमारी कन्याकुमारीच्या प्रज्ञा दीदी, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अविनाश देशपांडे, डॉ. उज्वला वनवे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर शनिवार दिनांक ०२ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता उद्घाटन करण्यात आले.
शहरातील बी.एस.एन.एल. ऑफीस जवळ, डी.पी. रोड, क्रांती नगर, बीड येथे हिलींग हँड्स या हॉस्पिटलच्या उद्घाटन समारंभासाठी आयोजित कार्यक्रमात उद्घाटक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अविनाश देशपांडे, डॉ. उज्वला वनवे, प्रज्ञा दीदी, एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक एस.एम.युसूफ़ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर ज्येष्ठ इतिहासकार, साहित्यिक, नाटककार, सुप्रसिद्ध लेखक तथा सेवानिवृत्त सहशिक्षक डॉ. सतीश साळुंखे, डॉ. संदीप बेदरे आणि आदर्श सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष परवेज़ सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक तथा सूत्रसंचालन पत्रकार ॲड. संदीप बेदरे यांनी केले तर कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन डॉ. आदित्य कुलथे यांनी केले. उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमासाठी डॉ. सुवर्णा बेदरे कुलथे, सत्यकुमार कुलथे, श्रीकांत बेदरे, ॲड. संदीप बेदरे, संजयकुमार कुलथे यांनी परिश्रम घेतले.
======================================
*"आता एकाच ठिकाणी सर्व सेवा"*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) कार्यक्रम स्थळी येऊन *बातमी* लिहून मिळेल.
संपर्क -
*एस.एम.युसूफ़*
रमेशराव गंगाधरे यांची स्वस्त धान्य दुकान क्रमांक ४१, राजुरीवेस जवळ, भीमराज नगर, बीड.
संपर्क क्रमांक - *9021 02 3121*
*वेळ - दुपारी ५ ते रात्री ९ पर्यंत*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा