Breaking News

आमदार संदीप क्षीरसागर शंभर टक्क्यांनी नापास बिंदुसरा नदीवरील पुलाचा आणि महेदवीया दायरा कब्रस्तान च्या संरक्षक भिंतीचा प्रश्न सोडवलाच नाही


बीड।एस.एम.युसूफ़
बीड शहरातील मोमीनपुरा-खासबाग जोडणाऱ्या बिंदुसरा नदीवरील नियोजित पुलाचा प्रश्न तसेच मोमीनपुरा भागातील महेदवीया दायरा कब्रस्तान च्या दोन भिंती बांधून देण्याचा प्रश्न आमदार म्हणून संदीप क्षीरसागर यांना सोडवायला दिले होते पण हे दोन्ही प्रश्न ते त्यांच्या कार्यकाळात सोडवू शकले नाहीत. यामुळे आ. क्षीरसागर हे शंभर टक्क्यांनी नापास झाले आहे.
         याविषयी सविस्तर वृत्त असे की, कुरेशी मुहल्ला, मोमीनपुरा, मुहम्मदिया कॉलनी, बीड मामला या भागातील बहुसंख्य नागरिकांना विविध कामांसाठी शहरात येण्याकरिता जवळचा असलेला मार्ग हा बिंदुसरा नदी मधूनच येतो. जिल्हा रुग्णालयासह अनेक खाजगी दवाखान्यात जाणारे रुग्ण, विविध शैक्षणिक संस्था म्हणजेच शाळा महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी व शिक्षक, फ्रुट आडत मार्केट-भाजी मंडईत जाणारे विक्रेते आणि ग्राहक, बस स्टॅन्ड ला जाणारे-येणारे प्रवासी तसेच मोमीनपुरा भागातील मोठ्या कापड मार्केटमध्ये खरेदीसाठी जाणारे-येणारे ग्राहक बिंदूसरा नदीमधील याच मार्गाचा उपयोग करतात. हा मार्ग कच्चा असला तरी वर्षातील सात-आठ महिने येथून नागरिक पायी, सायकल, मोटरसायकल, ऑटो रिक्षा, चार चाकी वाहने आदींमधून ये-जा करतात. पावसाळ्यात जेव्हा नदीला पाणी येते तेव्हा मात्र हा जवळचा मार्ग बंद होऊन जातो. म्हणून नागरिकांना मोठा वळसा घेऊन बार्शी रोड मार्गे किंवा जुना बाजार मार्गे आणि दगडी पुलावरून जर पाणी वाहत असेल तर मग आंबेडकर पुतळा मार्गे मोठा वळसा घेऊन ये-जा करावी लागते. ही बाब लक्षात घेऊन खासबाग-मोमीनपुरा जोडण्यासाठी पुलाचे निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे देण्यात आलेला आहे. त्यावर कार्य व्हावे आणि हा नियोजित पूल तयार व्हावा, याकरिता आतापर्यंत दोन वेळा बिंदुसरा नदीमध्ये डुबकी लगाव आंदोलन केलेले आहे. यामुळे आमदारांना खळबळून जाग आली आणि त्यांनी फक्त कागदपत्रे घेऊन कधी अजित पवार तर कधी जयंत पाटलांना या प्रश्नी भेट घेतल्याचे तसेच पूल कम बंधारा बांधण्याची मोठ्या प्रमाणात हवा निर्माण केली परंतु त्यांचा कार्यकाळ संपला तरी त्यांना हा पूल बांधून घेता आला नाही. हा प्रश्न नव्वद गुणांचा होता परंतु तो त्यांना सोडवता आला नाही. दुसरा प्रश्न होता मोमीनपुरा भागात असलेल्या साडेचारशे वर्षांचा इतिहास लाभलेल्या ऐतिहासिक महेदवीया दायरा कब्रस्तान च्या दोन भिंती जीर्ण होऊन जमीन दोस्त झाल्याचा. त्या आमदार फंडातून बांधून द्याव्या याकरिता सुद्धा आमदार क्षीरसागर यांच्याकडे प्रश्न मांडला होता. यामुळे त्यांनी २३ जानेवारी २०२३ रोजी आपल्या लवाजम्यासह कब्रस्तानात येऊन पाहणी केली. संरक्षक भिंत बांधून देण्याचे आश्वासन दिले. त्याला आता पावणेदोन वर्षे झाली तरीही कब्रस्तानची संरक्षक भिंत त्यांना काही बांधून देता आली नाही. हा प्रश्न फक्त दहा गुणांचा होता, तरीही तो त्यांना सोडवता आला नाही. अशाप्रकारे हे दोन्ही प्रश्न त्यांच्या जवळपास संपलेल्या कार्यकाळात त्यांना सोडविता न आल्याने ते शंभर टक्क्यांनी नापास झाले आहे.



===============


*"आता एकाच ठिकाणी सर्व सेवा"*

१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
 
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.

३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

४) कार्यक्रम स्थळी येऊन *बातमी* लिहून मिळेल.

संपर्क -

*एस.एम.युसूफ़* 

रमेशराव गंगाधरे यांची स्वस्त धान्य दुकान क्रमांक ४१, राजुरीवेस जवळ, भीमराज नगर, बीड.
संपर्क क्रमांक - *9021 02 3121*
*वेळ - दुपारी ५ ते रात्री ९ पर्यंत*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत