आदर्श व्यक्तिमत्त्वाला प्रत्यक्ष भेटण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही पत्रकारितेमुळे त्यांची भूमिका करणाऱ्या नायकाला चित्रपटात प्रश्न विचारायची संधी मिळाली
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातून विक्रमी ११ वेळा निवडून आलेले दिवंगत गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब या आदर्श व्यक्तिमत्वाला प्रत्यक्षात भेटण्याची संधी जिवनात कधी मिळाली नाही. मात्र त्यांच्यावर आधारित कर्मयोगी आबासाहेब या मराठी-हिंदी चित्रपटात त्यांची भूमिका करणारे नायक अनिकेत विश्वासराव यांना रुपेरी पडद्यावर प्रश्न विचारण्याची संधी मिळाली ती पत्रकारिता आणि या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांच्यामुळे.
महाराष्ट्रात ऊसतोड कामगारांचा जिल्हा, जवळपास प्रत्येक दृष्टिकोनातून मागास असलेला जिल्हा म्हणून ज्या जिल्ह्याला ओळखले जाते किंबहुना हिनवले जाते अशा बीड जिल्ह्याच्या बीड शहरात राहून गेल्या १० वर्षापासून एक छंद म्हणून पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी विषय, सामाजिक प्रश्न सातत्याने मांडत असल्याने या लेखनाची नोंद एक जागरूक चित्रपट लेखक, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार असलेले सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र, बीड जिल्ह्याचे जावई आणि गेल्या काही वर्षापासून पुणे येथे स्थायिक झालेले मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत नावाजलेले अल्ताफ दादासाहेब शेख यांनी घेतली.
कारण पुणे येथून प्रकाशित होऊन जवळपास महाराष्ट्र भरातील वृत्तपत्र क्षेत्रात उल्लेखनीय असलेल्या "सायं. दैनिक जनमंथन" चा बीड जिल्हा विशेष प्रतिनिधी म्हणून लिखाण करीत असल्याचे त्यांना माहीत होते. जेव्हा त्यांनी कर्मयोगी आबासाहेब हा चित्रपट निर्माण करायचे ठरविले तेव्हा आबासाहेबांची भूमिका करत असलेले नायक अनिकेत विश्वासराव यांना निवडणूक निकालानंतर प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराच्या भूमिकेसाठी मोठ्या आदराने मला बोलविले. हे माझे भाग्य आणि अल्ताफ शेख यांचा मोठेपणा.
कारण यापूर्वी चित्रपटाच्या कॅमेऱ्यासमोर येणे तर दूर, चित्रपटाचे चित्रीकरण कसे केले जाते हे सुद्धा माहित नसलेला मी, चक्क पत्रकाराच्या भूमिकेत चित्रपटाच्या नायकासमोर बसून प्रश्न विचारतोय हे एखाद्या स्वप्नासारखे होते. विशेष म्हणजे ज्या आबासाहेबांवर हा चित्रपट तयार करण्यात आला आहे, त्यांच्याविषयी फार वर्षांपूर्वी जेव्हा मी वृत्तपत्रांसाठी लिखाण करीत नव्हतो किंबहुना पुढे चालून मी सुद्धा वृत्तपत्रात लिहू शकेल असे सुद्धा कधी ध्यानीमनी नव्हते.
तेव्हा एका दैनिकात आदरणीय गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब यांच्या विषयी एक पूर्ण पान कव्हर स्टोरी प्रकाशित करण्यात आली होती. त्यात त्यांचे जवळपास संपूर्ण जीवनमान अधोरेखित करण्यात आले होते. ते वाचल्यानंतर त्यांच्याविषयी बरेच काही जाणून घेण्याची उत्सुकता होती. शक्य होईल तेवढे त्यांच्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असायचो. मनात एक जिज्ञासा होती की त्यांना प्रत्यक्षात भेटावे, त्यांच्याशी बोलावे परंतु हा योग काही आला नाही. त्यांची भेट घेण्याची संधी दुर्दैवाने कधीही मिळाली नाही.
परंतु फुल न फुलाची पाकळी म्हणतात तसे कर्मयोगी आबासाहेब या मराठी-हिंदी चित्रपटात आबासाहेबांची भूमिका साकारणाऱ्या नायकासमोर (अनिकेत विश्वासराव) बसून त्यांच्या पात्राला प्रश्न विचारण्याची संधी अल्ताफ शेख यांच्यामुळे या चित्रपटात मिळाली.
हा चित्रपट येत्या २५ ऑक्टोबर २०२४ शुक्रवार रोजी संपूर्ण जगभरात मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत प्रदर्शित होत आहे. विशेष म्हणजे प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाला तीन पुरस्कार मिळाले असून वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सुद्धा नोंद झाली आहे.
या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख हे स्वतः सोलापूर जिल्ह्यातले असल्याने आणि या जिल्ह्याच्याच सांगोला विधानसभा मतदार संघातून दिवंगत गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब हे अकरा वेळा निवडून आल्याने त्यांच्याविषयी अल्ताफ शेख यांना बरीच माहिती आहे.
म्हणून त्यांनी आबासाहेबांसारख्या उत्तुंग, निष्कलंक आणि आदरणीय व्यक्तिमत्त्वावर आधारित कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटाला निश्चितच चांगल्या प्रकारे न्याय दिला असेल तसेच चित्रपट रसिक सुद्धा निश्चितपणे या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देतील असा विश्वास वाटतो.
*- एस.एम.युसूफ़*
आसेफ़नगर, बीड
संपर्क - ९०२१ ०२ ३१२१
==================
*"आता एकाच ठिकाणी सर्व सेवा"*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) कार्यक्रम स्थळी येऊन *बातमी* लिहून मिळेल.
संपर्क -
*एस.एम.युसूफ़*
रमेशराव गंगाधरे यांची स्वस्त धान्य दुकान क्रमांक ४१, राजुरीवेस जवळ, भीमराज नगर, बीड.
संपर्क क्रमांक - *9021 02 3121*
*वेळ - दुपारी ५ ते रात्री ९ पर्यंत*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा