Breaking News

मुस्लीम महेदवीया समुदायाशी संबंधित महाराष्ट्र सरकारच्या राजपत्रातील गंभीर त्रुटी सुधारा सय्यद अली दिलावर फर्रूख़ आणि एस.एम.युसूफ़ यांची मागणी

 


बीड (एस.एम.न्युज़) - मुस्लीम महेदवीया समुदायाशी संबंधित महाराष्ट्र सरकारच्या राजपत्रातील गंभीर त्रुटी सुधारा अशी मागणी एल.एम.एम.ग्रुप ग्लोबल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सय्यद अली दिलावर फर्रूख़ आणि जिल्हाध्यक्ष तथा एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक एस.एम.युसूफ़ यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अल्पसंख्यांक कल्याण मंत्री आणि राजपत्र विभागाचे कार्यकारी संपादक तथा सचिव डॉ. डी.पी. बाळसेकर यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

      याविषयी ई-मेल द्वारे पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, दिनांक १० मे २०२२ रोजी राजपत्र विभागाचे कार्यकारी संपादक तथा सचिव डॉ. डी.पी. बाळसेकर यांना मुस्लिम महेदवीया समुदायाशी संबंधित महाराष्ट्राच्या सरकारी राजपत्रातील गंभीर त्रुटी दुरुस्त करण्याची विनंती केलेली आहे. विनंती केलेली सर्व कागदपत्रे १४ मे २०२२ रोजी महाराष्ट्र राजपत्र विभागाच्या सचिवांना देण्यात आली आहेत. महाराष्ट्र राजपत्र विभागाच्या सचिवांनी त्यांची शिफारस महाराष्ट्र सरकारच्या अल्पसंख्यांक विभागाच्या मुंबई येथील उपसचिवांकडे दिनांक १७ एप्रिल २०२३ रोजी मंजुरीसाठी पाठवली आहे. आजपर्यंत, राजपत्र विभागाच्या सचिवांना महाराष्ट्र सरकारच्या अल्पसंख्यांक विभागाच्या उपसचिवांकडून मंजुरी मिळालेली नाही. तरी कृपया उपसचिवांना या मंजुरीला गती देण्याचे निर्देशित करावे. यामुळे महाराष्ट्र राजपत्र विभागाच्या सचिवांना आवश्यक सुधारणा करता येतील. विशेष म्हणजे याविषयी राजपत्र विभागाचे कार्यकारी संपादक तथा सचिव डॉ. डी.पी. बाळसेकर यांनी दिनांक १७ एप्रिल २०२३ रोजी मंत्रालयातील अल्पसंख्यांक विभागाचे उपसचिव यांना पत्र पाठवून दीड वर्षाचा मोठा कालावधी उलटूनही अद्याप पर्यंत मंत्रालयातील अल्पसंख्यांक विभागाच्या उपसचिवांनी अद्याप पर्यंत राजपत्र विभागाचे कार्यकारी संपादक तथा सचिव डॉ. डी.पी. बाळसेकर यांच्या पत्राला अनुसरून अजून कोणतीही कारवाई केली नाही किंवा पत्राला उत्तरही दिले नाही. यामुळे आज दिनांक ७ सप्टेंबर २०२४ रोजी सय्यद अली दिलावर फर्रूख यांनी तर ९ सप्टेंबर २०२४ रोजी एस.एम.युसूफ़ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ई-मेलद्वारे याविषयी सविस्तर माहितीचे निवेदन पाठविले असून मुस्लीम महेदवीया समुदायाशी संबंधित महाराष्ट्र सरकारच्या राजपत्रातील गंभीर त्रुटी सुधारण्याची मागणी केली आहे.

=======================

*"आता एकाच ठिकाणी सर्व सेवा"*


१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.

 

२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.


३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.


४) कार्यक्रम स्थळी येऊन *बातमी* लिहून मिळेल.


संपर्क -


*एस.एम.युसूफ़* 


रमेशराव गंगाधरे यांची स्वस्त धान्य दुकान क्रमांक ४१, राजुरीवेस जवळ, भीमराज नगर, बीड.

संपर्क क्रमांक - *9021 02 3121*

*वेळ - दुपारी ५ ते रात्री ९ पर्यंत*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत