Breaking News

सावित्री-फातिमा सद्भावना मंच बीडची नूतन कार्यकारिणी जाहीर भागवत तावरे, अमरसिंग ढाका सुफ़ियान मणियार, शेख अब्दुल हमीद, एस.एम.युसूफ़ यांची कार्यकारिणीवर निवड


बीड (एस.एम.न्युज़) - आज सावित्री-फातिमा सद्भावना मंच बीड च्या कार्यकारिणीची बैठक शहरातील नीलकमल हॉटेल येथे ज्येष्ठ विचारवंत व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सय्यद रफिक पारनेर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत मंचाच्या नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. कार्यकारणीत लोकपत्रकार भागवत तावरे यांची अध्यक्षपदी, अमरसिंग ढाका व सूफ़ियान मणियार यांची उपाध्यक्षपदी, शेख अब्दुल हमीद यांची सचिवपदी तर एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक एस.एम.युसूफ़ यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
         शहरात शांती, सद्भावना अबाधीत राहावी, सामाजिक सलोखा वाढावा या उदात्त हेतूने स्थापन करण्यात आलेल्या सद्भावना मंचचा एक वर्षाचा कार्यकाल संपल्यामुळे वर्ष २०२४-२५ या वर्षासाठी कार्यकारिणीची निवड करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित सदस्यांच्या सहमतीने वरील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. या बैठकीत ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. रफिक पारनेरकर यांनी वरील कार्यकारिणीची घोषणा करून नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. नवीन सल्लागार मंडळात प्रा. नागरगोजे, प्रसिद्ध उद्योगपती गौतम खटोड, मौलाना इलयास पटेल, सय्यद शफीक हाश्मी, प्रा. शेख इलयास, प्रशिक वंजारे, ॲड. ओमप्रकाश गायकवाड, इंजि. जे. एन. भोरे, काळे सर यांचा समावेश करण्यात आला आहे. बैठकीच्या शेवटी सावित्री-फातिमा सद्भावना मंचचे नवनियुक्त सचिव शेख अब्दुल हमीद यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि ही बैठक संपन्न झाली.


======================

*"आता एकाच ठिकाणी सर्व सेवा"*

१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
 
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.

३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

४) कार्यक्रम स्थळी येऊन *बातमी* लिहून मिळेल.

संपर्क -

*एस.एम.युसूफ़* 

रमेशराव गंगाधरे यांची स्वस्त धान्य दुकान क्रमांक ४१, राजुरीवेस जवळ, भीमराज नगर, बीड.
संपर्क क्रमांक - *9021 02 3121*
*वेळ - दुपारी ५ ते रात्री ९ पर्यंत*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत