Breaking News

गौरी-गणपती आले-गेले; आनंदाचा शिधा अजून मिळाला नाही यापूर्वीही आनंदाचा शिधा लोकसभा निवडणुकीची भेट चढला

 

बीड (एस.एम.न्युज़) - शासनाकडून गौरी-गणपतीच्या सणासाठी गोरगरीब रेशन कार्डधारकांकरिता जाहीर झालेला आनंदाचा शिधा गौरी-गणपती आले आणि गेले तरीही अजून पर्यंत मिळालेला नाही. विशेष म्हणजे यापूर्वीही लोकसभा निवडणुकीच्या वेळेत जाहीर करण्यात आलेला आनंदाचा शिधा निवडणूक आचारसंहितेमुळे रेशन कार्डधारकांना वितरित करण्यात आला नव्हता. आताही विधानसभा निवडणूक करिता आचारसंहिता लागू शकते. त्याअगोदर जर आनंदाचा शिधा रेशन कार्डधारकांना मिळाला नाही तर या वेळेसही आनंदाचा शिधा विधानसभा निवडणुकीची भेट चढेल असे वाटत आहे.
          शासन कोणाचेही असो ते चालविताना कोणताही पक्ष अथवा नेते असो सत्तेत असताना लोकाभिमुख निर्णय घेऊन चालविले जावे. हा लोकशाहीचा दंडक आहे. यामुळे सत्तेत आलेले शासनकर्ते आपल्या परीने काही निर्णय घेतात आणि त्याची अंमलबजावणी करतात. हे करताना वेळेचे भान राखणेही आवश्यक असते परंतु सध्या राज्यात असलेले त्रिमूर्ती सरकार याकडे साफ दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. यामुळेच यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या वेळेस गोरगरीब रेशन कार्ड धारकांना वितरित करण्यासाठी येणारा आनंदाचा शिधा देण्यात आला नाही. कारण आनंदाचा शिधा ज्या पिशव्यांमध्ये देण्यात येतो, त्यावर देशाचे विद्यमान पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अन्नपुरवठा मंत्र्यांचे छायाचित्र छापण्यात आलेले आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागलेली असल्याने आनंदाचा शिधा तेव्हा वितरित करण्यात येऊ शकला नव्हता. आता ही शासनाने गौरी-गणपती सणासाठी सर्वसामान्य गोरगरीब रेशन कार्डधारकांना आनंदाचा शिधा देण्याची घोषणा तर केली खरी परंतु नेहमीप्रमाणे यावेळीही गौरी आणि गणपती आले ही आणि गेले ही, तरीही शासनाकडून देण्यात येणारा आनंदाचा शिधा अजूनही राशन दुकानांवर आला नाही. दुकानातच आला नाही तर गोरगरीब रेशन कार्डधारकांना मिळेल कसा? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. लवकरच राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत, तत्पूर्वीच आनंदाचा शिधा शासनाकडून आला आणि तो गोरगरीब राशन कार्डधारकांना वितरित करण्यात आला तरच मिळू शकतो अन्यथा एकदा आचारसंहिता जाहीर झाली की, मग आनंदाच्या शिधावर असलेल्या मंत्र्यांच्या छायाचित्रांमुळे तो आचारसंहितेत अडकतो आणि वितरित करता येत नाही. यंदाही जर आचारसंहिता लागली तर आनंदाचा शिधा यावेळेसही विधानसभा निवडणुकीच्या भेट चढेल असे वाटते.

आनंदाचा शिधा जाहीर झाल्यानंतर येत आहे एक-एक वस्तू 

गौरी-गणपती साठी आनंदाचा शिधा देण्याची घोषणा शासनाने केल्यानंतर ज्या चार वस्तू यात देण्यात येणार आहे, त्यापैकी आतापर्यंत गोडतेल, चणाडाळ आणि रवा या तीन वस्तू आतापर्यंत आल्याचे तर साखर अजूनही आली नसल्याचे कळते. तसेच साखर आल्यानंतर शासकीय गोदामातून या चारही वस्तू तहसीलच्या पुरवठा विभागाकडून राशन दुकानदारांना वितरित करण्यात येतील आणि नंतरच ते सर्वसामान्य गोरगरीब राशन कार्डधारकांना मिळतील असे कळते. तत्पूर्वी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू नये म्हणजे मिळवलं.

*"आता एकाच ठिकाणी सर्व सेवा"*

१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
 
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.

३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

४) कार्यक्रम स्थळी येऊन *बातमी* लिहून मिळेल.

संपर्क -

*एस.एम.युसूफ़* 

रमेशराव गंगाधरे यांची स्वस्त धान्य दुकान क्रमांक ४१, राजुरीवेस जवळ, भीमराज नगर, बीड.
संपर्क क्रमांक - *9021 02 3121*
*वेळ - दुपारी ५ ते रात्री ९ पर्यंत*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत