नबी-ए-करीम सल्लल्लाहू अलैही व सल्लमचे उम्मती
बीड (एस.एम.न्युज़) - मुंबईत मुस्लिमांचा महापूर बघून लोकप्रतिनिधींना आता खळबळून जाग आली आहे. म्हणूनच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवायची लोकप्रतिनिधींमध्ये लागली स्पर्धा लागली आहे. मात्र पत्र पाठवणारे हेच लोकप्रतिनिधी दोन्ही सदनात आवाज उठवतील का? बोलक्या पोपटांवर कारवाई करण्यास सरकारला भाग पाडतील काय? असे प्रश्न उपस्थित होत असून नबी-ए-करीम सल्लल्लाहू अलैही व सल्लमचे उम्मती आता शांत बसणार नाही असे चित्र आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की, बोलके पोपट असलेले रामगिरी महाराज आणि आ. नितेश राणे यांनी इस्लाम, मुहम्मद पैगंबर आणि मुस्लिमांविरुद्ध जी गरळ, जे विष ओकत पोपटपंची केली. त्याविरुद्ध मुस्लिम समाज एकवटून कमालीचा पेटला आहे. यामुळे नुकतेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून, तालुक्यातून, खेड्यापाड्यातून नबी-ए-करीम सल्लल्लाहू अलैही व सल्लमचे उम्मती लाखोंच्या संख्येने या दोन्ही बोलक्या पोपटांवर कारवाई व्हावी म्हणून तिरंगा रॅली घेऊन मुंबई धडकले. कधी नव्हे ते मुस्लिम समाज एवढ्या मोठ्या लाखोंच्या संख्येने राजधानीत धडकला. हे पाहून स्वतःला सेक्युलर म्हणणाऱ्या अनेक लोकप्रतिनिधींना खळबळून जाग आली आणि बोलक्या पोपटांच्या वक्तव्यानंतर झोपेचे सोंग घेऊन बसलेल्या या लोकप्रतिनिधींनी आता या दोघांवर कारवाई करावी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र धाडण्यास सुरुवात केली आहे. पत्र पाठवण्यात असे येवू लागले जसे यांच्यात एक प्रकारची चुरस आणि स्पर्धा लागली आहे. अशा प्रकारे दररोज दनादन पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविले जात आहेत. हे पाहता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाज जर एकवटला तर आपले होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागणार नाही, याचा अंदाज धूर्त राजकारण्यांना आल्यानेच आता ही पत्रापत्री सुरू झाल्याचे जनतेतून बोलले जात आहे. असे असले तरी जर खरेच असे पत्र पाठविणाऱ्या या लोकप्रतिनिधींना इस्लाम, मुहम्मद पैगंबर आणि मुस्लिमांबद्दल माणुसकी, नैतिकता असेल तर यांनी लोकशाहीच्या दोन्ही सदनात याविषयी प्रश्न उपस्थित करावे आणि अशी बेताल वटवट करणाऱ्या पोपटांवर कडक शासन करण्यास सरकारला भाग पाडावे असेही बोलले जात आहे. या सर्व घटनांची आणि मुंबईत धडकलेल्या लाखोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांची तिरंगा रॅली पाहता यापुढे आता नबी-ए-करीम सल्लल्लाहू अलैही व सल्लमचे उम्मती शांत बसणार नाहीत असे दिसून येते.
दोघांना अटक केल्याशिवाय वातावरण थंड होणार नाही!
स्वतःला संत महंत म्हणवून घेणाऱ्या रामगिरी महाराजांनी न शोभणारी अशी भाषा करत इस्लाम धर्म व प्रेषितांबद्दल जे काही उपद्व्यापी वक्तव्य केले ते करायला नको होते. निदान एका संताकडून तरी दुसऱ्या धर्मावर किंवा प्रेषितांवर अशा प्रकारे काहीबाही बरडण्याची अपेक्षा सर्वसामान्यांसह बुद्धिजीवी नागरिकांना सुद्धा पचत नाही मग ते कोणत्याही जाती धर्माचे का असेना. यामुळे धर्मगुरू असो की संत महंत, सर्वांनी आपापल्या धर्माच्या परिघात राहून वावरणे, बोलणे, व्यक्त होणे लोकांना अपेक्षित असते. इथे मात्र रामगिरींनी याच परिघाचे उल्लंघन केल्याने वातावरण तापले आहे.
जीव छोटा पण खूमखूमी फार?
भाजपचे विद्यमान आमदार नितेश राणे हे तसे वयाने, उंचीने तसेच राजकीय अनुभवाने सुद्धा फारच छोटे आहेत परंतु म्हणतात ना लहान तोंडी मोठा घास जर घेतला तर जे नको असते तेच होते. सध्या याचाच प्रत्यय नितेश राणे बद्दल राज्यभरातील जनतेला येत आहे. अनुभवाने कमी उंचीने कमी असलेला हा माणूस व्यासपीठावर उभा राहून जो काही बरडतो ते पाहता या माणसाची बुद्धी सुद्धा छोटी आणि लहान असल्याचे सिद्ध होत आहे. यामुळे त्याचाही किंवा राज्याचाही कुठला फायदा तर होणार नाहीच परंतु दोन धर्मातील जनतेमध्ये विनाकारण वितुष्ट निर्माण होईल. असे या माणसाचे वर्तन आहे. अशा बोल घेवड्याला वरिष्ठ मंडळींनी जर वेळीच आवरले नाही तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज लागणार नाही.
मुस्लिम बांधवांना त्रिवार मानाचा मुजरा
इस्लाम, मुहम्मद पैगंबर आणि स्वतः मुसलमानांविषयी नको ते वक्तव्य करणाऱ्या लोकांबद्दल मनात, डोक्यात आणि नजरेत प्रचंड राग, असंतोष तसेच तिरस्कार निर्माण झालेला असतानाही मुस्लिम बांधवांनी ज्या शांत चित्ततेने हे सर्व प्रकरण हाताळले, दोघा उपटसुंबांच्या आक्षेपार्क्ष विधानानंतर समाज बांधवांमध्ये फुटलेल्या ज्वालामुखीचा उद्रेक होऊ न देता लोकशाही पद्धतीने उत्तर देण्यासाठी ज्या तऱ्हेने राज्यभरातून मुंबईत शांततेने गेले आणि परतले या सर्व प्रक्रियेमध्ये पैगंबरांची शिकवण विसरले नाही. कोणताही आकांड तांडव न करता काहीही नासधुस किंवा नुकसान न करता आपले म्हणणे मांडले हे पाहून संपूर्ण इस्लाम धर्मीय मुसलमान धन्य झाले आहेत. अशा या नबी-ए-करीम सल्लल्लाहू अलैही व सल्लमच्या उम्मतींना त्रिवार मानाचा मुजरा.
================
*"आता एकाच ठिकाणी सर्व सेवा"*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) कार्यक्रम स्थळी येऊन *बातमी* लिहून मिळेल.
संपर्क -
*एस.एम.युसूफ़*
रमेशराव गंगाधरे यांची स्वस्त धान्य दुकान क्रमांक ४१, राजुरीवेस जवळ, भीमराज नगर, बीड.
संपर्क क्रमांक - *9021 02 3121*
*वेळ - दुपारी ५ ते रात्री ९ पर्यंत*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा