Breaking News

आनंदाचा शिधा आचारसंहितेतून वगळा; पिशव्यांवरून मंत्र्यांचे छायाचित्रे हटवा!


बीड (एस.एम.न्युज़) - शासनाकडून अवघ्या शंभर रुपयात देण्यात येणारा आनंदाचा शिधा गौरी गणपती सणानिमित्ताने वाटप करण्यात येणार असून बीड जिल्ह्यात साडेचार लाख कार्ड धारकांना आनंदाचा शिधा मिळणार आहे.
          गेल्या वेळी गुढीपाडवा, रामनवमी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्ताने जाहीर झालेला आनंदाचा शिधा लोकसभा निवडणूकीसाठी लागलेल्या आचारसंहितेमुळे रेशन कार्डधारकांना वाटप करण्यात आला नव्हता. आता गौरी गणपती सणानिमित्ताने आनंदाचा शिधा देणार असल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब गट व १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील एपीएल कार्डधारकांना आगामी गौरी गणपती उत्सवानिमित्त आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यातील सुमारे साडेचार लाख कार्ड धारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा मिळणार आहे. या आनंदाच्या शिधात प्रत्येकी एक किलो साखर, चणाडाळ, रवा व एक लिटर गोडतेल यांचा समावेश असणार आहे. यासाठी जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून जिल्ह्यातील कार्डधारकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक कार्डधारकाला एक किट याप्रमाणे आनंदाचा शिधा वाटप केला जाणार असून सदरील किट वाटप करताना कार्डधारकांना रेशन दुकानदारांकडे असलेल्या मशीनला अंगठा लावूनच किट घेता येणार आहे. ऑनलाइन पद्धतीने आनंदाचा शिधा वाटप करण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा कार्यालयाला देण्यात आल्या आहेत. 

शासनाला द्यायचेच आहे तर आचारसंहितेतून वगळावे 

गोरगरीब रेशन कार्डधारकांना आनंदाचा शिधा वेगवेगळ्या सणा निमित्ताने शासनाकडून देण्यात येत आहे. अल्प दरात सर्वसामान्य गोरगरिबांचा सण साजरा व्हावा, याकरिता ही योजना सुरू करण्यात आली आहे. अशा चांगल्या हेतूने सुरू करण्यात आलेली ही योजना निवडणुका जाहीर झाल्या अन् आचारसंहिता लागली की थांबविण्यात येते. अशाच प्रकारे गेल्या वेळेस गुढीपाडवा, रामनवमी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्ताने देण्यात येणारा आनंदाचा शिधा रेशन कार्डधारकांना वाटप करण्यात आला नव्हता. कारण लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली होती. यामुळे त्यावेळी वर उल्लेख केलेले सर्व सण सर्वसामान्य गोरगरिबांना आनंदाच्या शिधा विना साजरे करावे लागले होते.

आनंदाचा शिधा आचारसंहितेतून असा वगळता येईल!

आनंदाचा शिधा शासनाकडून देण्यात येत आहे. त्यासाठी ज्या छापील पिशव्या देण्यात येतात त्यावर प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, अन्नपुरवठा मंत्री आदींचे छायाचित्र छापलेले असतात. फक्त या एकाच कृतीमुळे आचारसंहिता सुरू असताना सर्वसामान्य गोरगरीब रेशन कार्डधारकांना आनंदाचा शिधा वाटप करता येत नाही. ही बाब लक्षात घेता मंत्र्यांनी आपल्या छायाचित्रांना मुरळ घालावी. वाटल्यास छापील ऐवजी कोऱ्या पिशव्यात आनंदाचा शिधा द्यावा. जेणेकरून आचार संहितेत आनंदाचा शिधा फसू नये. याची दक्षता सर्वसामान्य गोरगरिबांसाठी शासनाने घ्यायलाच हवी.


==================


*"आता एकाच ठिकाणी सर्व सेवा"*

१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
 
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.

३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

४) कार्यक्रम स्थळी येऊन *बातमी* लिहून मिळेल.

संपर्क -

*एस.एम.युसूफ़* 

रमेशराव गंगाधरे यांची स्वस्त धान्य दुकान क्रमांक ४१, राजुरीवेस जवळ, भीमराज नगर, बीड.
संपर्क क्रमांक - *9021 02 3121*
*वेळ - दुपारी ५ ते रात्री ९ पर्यंत*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत