अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवलतीसाठी दिलेल्या लढ्यास अखेर यश अल्पसंख्यांक आयुक्तालय आणि मार्टीची स्थापना सर्व मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांचे हृदयी आभार - सय्यद नबीलज़मा, सदस्य मार्टी कृती समिती, बीड
बीड (एस.एम.न्युज) - बऱ्याच काळापासून अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयी-सवलतींसाठी मार्टी कृती समितीकडून देण्यात येत असलेल्या लढ्यास अखेर दुहेरी यश प्राप्त झाले आहे. या लढ्यात शिफारस केलेल्या सर्व आमदार आणि पदाधिकाऱ्यांसह मंत्री गणांचेही सय्यद नबीलज़मा सदस्य मार्टी कृती समिती यांनी हृदयी आभार व्यक्त केले आहे.
अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना इतर समाजाच्या तुलनेत शासनाकडून आवश्यक त्या प्रमाणात सोयीसुविधा मिळत नव्हत्या म्हणून अल्पसंख्यांक समाजातील सर्वसामान्य गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अनंत अडचणी येत होत्या. यामुळे गेल्या काही काळापासून मार्टी कृती समितीने अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी लढा देण्याचा विडा उचलला होता. अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना काही सोयीसवलती मिळाव्यात म्हणून मार्टी कृती समितीने अनेकदा निवेदने दिली, धरणे आंदोलन केले, वेळोवेळी आमदारांना पदाधिकाऱ्यांना सदनात लक्षवेधी मांडण्याचा आग्रह धरला, मुंबईच्या मौलाना आझाद मैदानात मोर्चा काढून आंदोलनही केले. यात अनेक आमदारांचे सहकार्य मिळाले. अनेक आमदारांनी शिफारस पत्रे दिली तसेच मार्टी कृती समितीने योग्य दिशेने सातत्याने पाठपुरावा केला. यामुळे मंत्र्यांनाही या सर्व गतिविधतेची दखल घ्यावी लागली आणि यामुळेच मार्टी कृती समितीला दुहेरी यश प्राप्त झाले आहे. यामुळे आता यापुढे अल्पसंख्यांक समाजातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर समाजातील विद्यार्थ्यांसारख्या सोयीसुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. म्हणून या कामी मार्टी कृती समितीला सहकार्य केलेले सर्व आमदार, पदाधिकारी यांच्यासह मंत्र्यांचेही सय्यद नबीलज़मा, सदस्य मार्टी कृती समिती, बीड यांनी हृदयी आभार मानले आहे.
सहा वर्षांपासून सुरू होता संघर्ष
अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शासनाकडून शैक्षणिक सोयी-सुविधा मिळाव्यात म्हणून मार्टी कृती समितीकडून सन 2019 पासून पाठपुरावा सुरू होता. 6 वर्षांचा भला मोठा कालावधी उलटूनही मार्टी कृती समितीने हार मानली नाही किंवा माघार घेतली नाही. कृती समिती सातत्याने लढा देत राहिली. शेवटी याचे फळ 6 वर्षानंतर का होईना मिळाले, संघर्ष फळास आले.
संपादक शेख तय्यब यांचेही मोलाचे योगदान
मार्टी कृती समिती ने याविषयी सातत्याने पाठपुरावा करून जमवलेल्या कागदपत्रांची फाईल शासन दरबारी जमा केल्यानंतर त्यात त्रुटी निघाली. तेव्हा कृती समितीला धक्का बसला होता पण यातून सावरण्यासाठी संपादक शेख तय्यब यांनी मोलाची साथ दिली. त्यांनी आपल्या पातळीवर राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे हा मुद्दा जोमाने मांडला. अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिक्षण घेताना शासनाच्या मदतीची कशी गरज आहे, हे पटवून देण्यात शेख तय्यब यांनी मोलाचा वाटा उचलला.
इद्रीस नाईकवाडी आणि वसीम बुऱ्हान यांचेही सहकार्य
राष्ट्रवादी पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष तथा कार्याध्यक्ष इद्रीस नाईकवाडी आणि वसीम बुऱ्हान यांनी कृती समितीच्या सांगण्यावरून अजित पवार यांच्याकडे विशेष जोर लावला.
मार्टी कृती समिती महाराष्ट्र यांचा होता समावेश
ॲड.अझहर (औरंगाबाद), ॲड. शहेबाज (मुंबई), ॲड. वसीम (बुलढाणा), सय्यद नबील उज़्ज़मा (बीड), आसीफ़ सर (औरंगाबाद), ॲड. बारी (नागपूर), उमैर (नागपूर), समीउल्लाह (परभणी), ॲड. क़य्यूम (औरंगाबाद), जलीस (औरंगाबाद), अशरफ (परभणी) यांच्यासह मार्टी कृती समितीतील सर्वच सदस्य.
मार्टी कृती समिती बीड यांचा होता समावेश
प्रा. सी.आर. पटेल, संपादक काझी मखदूम, मुफ़्ती अब्दुल्ला कुरेशी, प्रा. जावेद पाशा, डॉ. सिराज खान, मुज़्तबा अहेमद खान, मुजीब काझी, सय्यद हसीन अख्तर, खुर्शीद आलम, प्रा, इलयास इनामदार, शेख समीर, गुलाम साकिब यांच्यासह अन्य सदस्यांचा सहभाग होता.
कृती समितीच्या निवेदनांवर लक्षवेधी केलेले आमदार
विजय वडेट्टीवार, बच्चु कडू, राजू नवघरे, कैलाश पाटील, भाई जगताप, अबू आसिम आझमी, रईस शेख, वजाहत मिर्झा, बाबा जानी दुर्राणी, राजेश एकडे या आमदारांनी कृती समितीच्या निवेदनांवर सदनात लक्षवेधी मांडली.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बीड, लातूर, उस्मानाबादच्या स्वायत्त संस्थेचे आमदार सुरेश धस, गेवराई चे आमदार लक्ष्मण पवार, केज च्या आमदार नमिता मुंदडा यांनी पत्र दिले. तर कृती समितीने धनजंय मुंडे, छगन भुजबळ, संजय बनसोडे, अदिती तटकरे, हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदने दिली.
============================
*"आता एकाच ठिकाणी सर्व सेवा"*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) कार्यक्रम स्थळी येऊन *बातमी* लिहून मिळेल.
संपर्क -
*एस.एम.युसूफ़*
रमेशराव गंगाधरे यांची स्वस्त धान्य दुकान क्रमांक ४१, राजुरीवेस जवळ, भीमराज नगर, बीड.
संपर्क क्रमांक - *9021 02 3121*
*वेळ - दुपारी ५ ते रात्री ९ पर्यंत*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा