Breaking News

पत्रकारितेचा सहावा पुरस्कार आणि वृक्षारोपण केल्याबद्दल एस.एम.युसूफ़ यांचा सत्कार

बीड (एस.एम.न्युज़) - गेल्या दहा वर्षापासून मुक्तपत्रकारिता करत असलेले एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक एस.एम.युसूफ़ यांना दैनिक प्रभास केसरी कडून नुकतेच आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पत्रकारिता क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना हा सहावा पुरस्कार मिळाला तसेच रस्त्यालगत वृक्षारोपण केल्याबद्दल बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांकडून शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कारित करण्यात आले.
           हा छोटेखानी सत्कार साप्ताहिक द स्कूल एक्सप्रेस च्या कार्यालयात करण्यात आला. यावेळी मुख्यसंपादक शेख एजाज, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष ओबीसी सेलचे शहराध्यक्ष सय्यद फरहान, शेर-ए-हिंद ग्रुप ऑफ महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष तथा बीड जिल्हा काँग्रेस कमिटी निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभागाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष शेख आमेर पाशा, ओबीसी सेल बीड शहर उपाध्यक्ष शेख नाजेद हमदान, नाथ शक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील धायडे, अब्दुल जब्बार मोमीन, शहानवाज यांची प्रमुख उपस्थिती होती.



==========================

*"आता एकाच ठिकाणी सर्व सेवा"*

१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
 
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.

३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

४) कार्यक्रम स्थळी येऊन *बातमी* लिहून मिळेल.

संपर्क -

*एस.एम.युसूफ़* 

रमेशराव गंगाधरे यांची स्वस्त धान्य दुकान क्रमांक ४१, राजुरीवेस जवळ, भीमराज नगर, बीड.
संपर्क क्रमांक - *9021 02 3121*
*वेळ - दुपारी ५ ते रात्री ९ पर्यंत*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत