दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या छत्रछायेखाली केशरी स्वातंत्र्य दिन साजरा केशरीला कवटाळून पांढऱ्या आणि हिरव्या पासून दुरावा; चुकीची प्रथा पडू नये!
बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करताना मुख्याध्यापकाने तिरंगा झेंड्यातील फक्त केशरी रंगाच्या पताका लावल्या तर पांढऱ्या आणि हिरव्या रंगाच्या पताक्यांची फारकत घेतली. यामुळे सदरील पताका लावणाऱ्यांचे तिरंग्यातील फक्त केशरी रंगावरच प्रेम असल्याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. येथे आज केशरी रंगाच्या पताका लावल्या पुढे चालून कुठे फक्त पांढऱ्या, हिरव्या, निळ्या, पिवळ्या इत्यादी रंगाच्या पताका लावल्या जातील, त्यामुळे स्वातंत्र्य दिनाचे आणि तिरंगा राष्ट्रीय ध्वजाचे पावित्र्य संपुष्टात येऊ शकते. यामुळे अशी चुकीची प्रथा पडू नये म्हणून शिक्षण विभागाने याकडे लक्ष देत असा खोडसाळपणा करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे.
आपल्या भारत देशाचा तिरंगा झेंडा केशरी, पांढरा आणि हिरव्या रंगाने तयार करण्यात आला आहे. हा तिरंगा झेंडा आम्हा भारतीयांना प्राणाहून प्रिय आहे. याच तिरंग्याकडे पाहून स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक क्रांतिकारकांनी आपला देश आणि आपल्या झेंड्यासाठी प्राणाची आहुती दिलेली आहे. हजारो क्रांतिकारक शहीद झाले. स्वतःचे जीवन त्यांनी आपल्या मातृभूमीसाठी, आपल्या देशाच्या तिरंगा ध्वजासाठी देऊ केले हा इतिहास आहे. तसेच आजही देशाच्या सीमेवर याच तिरंगा ध्वजाकडे पाहून आपले सैनिक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस एक करत आपल्या देशाची रक्षा करीत आहेत. वेळप्रसंगी शहीद होत आहेत. यामुळे प्रत्येक भारतीय आपल्या देशाच्या तिरंगा झेंड्याकडे पाहून स्फुरण घेतो. आपल्या देशाचा तिरंगा आम्हा भारतीयांसाठी जीव की प्राण आहे. म्हणून यातील केशरी, पांढरा आणि हिरवा हे तीन रंग आम्हाला विशेष जवळचे वाटतात परंतु अलीकडच्या काळात जाती-जातीत, धर्माधर्मात विष कालवणाऱ्यांनी आता या तिरंगा झेंड्यातील तीन रंगात सुद्धा राजकारण करत दुफळी-तिफळी निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. असाच प्रकार 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करताना जिल्हा परिषद च्या माध्यमिक शाळेत दिसून आला. स्वातंत्र्य दिन साजरा करताना करण्यात येणाऱ्या सजावटीमध्ये कागदी पताका लावण्यात येतात. त्या कागदी पताकांमध्ये मुख्यतः केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या रंगाच्या पताका लावल्या जातात. किंवा अन्य रंगांच्याही पताका लावल्या जातात. ही प्रथा स्वातंत्र्यापासून आजपर्यंत पाळली जाते परंतु या प्रथेला काळीमा फासण्याचे काम बीड जिल्हा परिषद शाळेत केल्याचे 15 ऑगस्ट 2024 रोजी दिसून आले. येथे पांढरा आणि हिरवा रंग वगळून फक्त केशरी रंगाच्या पताकाच लावल्यात आल्या. यामुळे पाहणाऱ्यांचे डोळे विस्फारले गेले आहेत. या कृती मागे कुणाचा हात आहे? त्याच्या मागे करविता धनी कोण आहे? असा प्रश्नही या अनुषंगाने उपस्थित होऊ लागला आहे. शिवाय जिथे ही शाळा आहे तिथेच शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि शिक्षणाधिकारी योजना या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांची कार्यालये आहेत. त्यांच्या छत्रछायेखाली असलेल्या शाळेत अशा प्रकारे कृती होत असेल तर ही चिंतनीय व निंदनीय बाब आहे.
जाणूनबुजुन केले की अवदसा आठवली?
आपल्या देशात 26 जानेवारी हा गणतंत्र दिवस म्हणून तर 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात येतात. तसेच राज्यात 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो तर मराठवाड्यात 17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या चारही दिनानिमित्ताने शाळा असो की, शासकीय-प्रशासकीय कार्यालय तिथे फार पूर्वी रंगबिरंगी कागदी किंवा कापडी पताका लावण्यात येत होत्या. परंतु गेल्या काही वर्षांपासून बहुतेक ठिकाणी केशरी पांढरे आणि हिरव्या रंगाच्या पताका लावल्या जात आहेत. असे असताना जिल्हा परिषद च्या माध्यमिक शाळेत यंदा 15 ऑगस्ट दिनी पांढरा आणि हिरवा रंग वगळून फक्त केशरी रंगाच्या पताका लावण्यात आल्या, हे संबंधित जाणूनबुजून केले की कुणाला अवदसा आठवली? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
येथे दोन शिक्षणाधिकारी असताना ....!
ज्या इमारतीमध्ये जिल्हा परिषदची ही माध्यमिक शाळा आहे, त्याच इमारतीमध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे तसेच शिक्षणाधिकारी योजना यांचेही कार्यालय आहे. म्हणजेच दोन-दोन शिक्षणाधिकारी ज्या इमारतीमध्ये आहेत, त्याच इमारतीमधील शाळेत आपल्या भारत देशाच्या तिरंगा झेंड्यातील केशरी, पांढरा आणि हिरवा या तीन रंगाच्या पताका लावण्याऐवजी फक्त केशरी रंगाला प्राधान्य दिले जाते. याला काय म्हणावे असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.
दोषींवर कारवाई होणे आवश्यक
जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत स्वातंत्र्यदिनासारख्या पवित्र दिनादिवशी फक्त एकाच रंगाच्या पताका लावून इतर रंगाची अवहेलना म्हणजेच तिरंगा झेंड्यातील दोन रंगाची विटंबना दोन-दोन शिक्षणाधिकाऱ्यांचे कार्यालय असलेल्या इमारतीच्या आवारात घडल्याने या प्रकरणात दोषी असलेल्या सर्वांवर योग्य आणि कडक कारवाई करणे आवश्यक आहे. याची दखल जिल्हा प्रशासनाने घेणे ही अपेक्षित आहे. अन्यथा अशी चुकीची प्रथा चालू होईल. आणि मग जो तो आपल्या सोयीनुसार केशरी, पांढऱ्या, हिरव्या, निळ्या, पिवळ्या, सह मनाला येईल त्या रंगाच्या पताका लावून तिरंग्यातील तीन रंगाची अवहेलना व विटंबना करायला मागेपुढे पाहणार नाही. याची दखल घेणे आवश्यक आहे.
==================================
*"आता एकाच ठिकाणी सर्व सेवा"*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) कार्यक्रम स्थळी येऊन *बातमी* लिहून मिळेल.
संपर्क -
*एस.एम.युसूफ़*
रमेशराव गंगाधरे यांची स्वस्त धान्य दुकान क्रमांक ४१, राजुरीवेस जवळ, भीमराज नगर, बीड.
संपर्क क्रमांक - *9021 02 3121*
*वेळ - दुपारी ५ ते रात्री ९ पर्यंत*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा