Breaking News

लोकसभा सदनातून सँगोल हटवा; भारतीय संविधानाची मोठी प्रत ठेवा नवनिर्वाचित खासदार आर.के. चौधरी यांची मागणी


दिल्ली (एस.एम.न्युज़) - लोकसभा निवडणूक निकालानंतर सुरू झालेल्या संसद भवनात नवनिर्वाचित खासदार आर.के. चौधरी यांनी संसदेतून सँगोल हटवून भारतीय संविधानाची मोठी प्रत ठेवावी अशी मागणी केली आहे.
      याविषयी त्यांनी लोकसभा अध्यक्ष यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, आज मी या सन्माननीय सदनात आपल्या समोर लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली आहे की, मी विधी द्वारे स्थापित भारताच्या संविधाना प्रति खरी श्रद्धा व निष्ठा ठेवीन परंतु सदनात सँगोल पाहून मला आश्चर्य वाटले. आपले संविधान भारतीय लोकशाहीचे एक पवित्र ग्रंथ आहे तर सँगोल अर्थात राजदंड राजतंत्राचे प्रतीक आहे. आपली संसद लोकशाहीचे मंदिर आहे. कोणत्या राजा महाराजाचा राजवाडा नाही. म्हणून मी विनंती करतो की, संसद भवनातील सँगोल हटवून भारतीय संविधानाची मोठी प्रत ठेवावी. अशी मागणी नवनिर्वाचित खासदार आर.के. चौधरी यांनी लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

========================

"आता एकाच ठिकाणी सर्व सेवा"

१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
 
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.

३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

४) कार्यक्रम स्थळी येऊन *बातमी* लिहून मिळेल.

संपर्क -

एस.एम.युसूफ़

रमेशराव गंगाधरे यांची स्वस्त धान्य दुकान क्रमांक ४१, राजुरीवेस जवळ, भीमराज नगर, बीड.
संपर्क क्रमांक - *9021 02 3121*
*वेळ - दुपारी ४ ते रात्री ९ पर्यंत*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत