Breaking News

निसर्गाची किमया न्यारी, गुलमोहरच्या खोडावर पिंपळ वास करी!


बीड।एस.एम.युसूफ़

शहरात असलेल्या नर्सरी रोडवरील वनसंरक्षक कार्यालयाच्या प्रांगणात एका गुलमोहराच्या झाडाच्या खोडावर पिंपळाचे झाड फक्त उगवलेच नाहीतर चांगले मोठे ही झाले असून आता हे पिंपळ गुलमोहराच्या खोडाशी एकरूप झाले आहे. 
नुकतेच बशीर गंज ते थोरातवाडी, थोरातवाडी ते शिवाजीनगर पोलीस ठाणे कॉर्नर आणि जुने पोलीस अधीक्षक कार्यालय ते जिल्हा रुग्णालय रस्त्यावर झाडांविना असलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपणासाठी झाडं लावायची असल्याने वनसंरक्षक कार्यालयात जाणे झाले. तिथे रस्त्यांवर लावण्यासाठी आवश्यक असलेले टणक, मजबूत व उंच झाडांची रोपे तर भेटली नाही परंतु वन संरक्षक अधिकारी यांच्या कार्यालयासमोर असलेल्या एका खोडावर सहज नजर पडली असता आश्चर्य झाल्यावाचून राहिले नाही. कारण आकाराने चांगले मोठे असलेल्या या मूळ गुलमोहराच्या खोडाला गुलमोहराचे फांद्या न दिसता खोडाच्या मधोमध पिंपळ दिसले. यामुळे तेथील कर्मचाऱ्यांकडून याबाबत माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की, या खोडावर गुलमोहराच्या फांद्या आपोआप वाळून गेल्या होत्या. परंतु फांद्यांच्या मध्ये जी जागा होती त्यात हे पिंपळ उगवून आले आणि पाहता पाहता आता हे पिंपळ मोठे झाले असून ते गुलमोहराच्या खोडा सोबत एकरूप झाले आहेत. अशाप्रकारे खोड गुलमोहराचे आणि झाड पिंपळाचे असा दोन्हींचा संगम येथे दिसून आला. यामुळे निसर्गाची किमयाच न्यारी, गुलमोहराच्या खोडावर पिंपळ वास करी म्हटल्याशिवाय राहवले नाही.

=========================


"आता एकाच ठिकाणी सर्व सेवा"

१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
 
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.

३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

४) कार्यक्रम स्थळी येऊन *बातमी* लिहून मिळेल.

संपर्क -

एस.एम.युसूफ़

रमेशराव गंगाधरे यांची स्वस्त धान्य दुकान क्रमांक ४१, राजुरीवेस जवळ, भीमराज नगर, बीड.
संपर्क क्रमांक - *9021 02 3121*
*वेळ - दुपारी ४ ते रात्री ९ पर्यंत*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत