Breaking News

सुप्रसिद्ध व्यापारी मनोज अग्रवाल यांना मातृशोक गीतादेवी यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन; मरणोपरांत केले नेत्रदान!


बीड (एस.एम.न्युज) - शहरातील अग्रवाल मेडिकल तथा सॅमसंग मोबाईल शॉपीचे संचालक मनोज अग्रवाल यांच्या मातोश्री गीतादेवी गणपतलालजी अग्रवाल यांना दिनांक २२ जून २०२४ शनिवार रोजी हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यातच त्यांचे निधन झाले. मृत्यू समयी त्या ८० वर्षांच्या होत्या. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार मरणोपरांत त्यांचे डोळे दान करण्यात आले. जिल्हा रुग्णालयाचे नेत्र शल्य चिकित्सा तज्ञ डॉ. राधेश्याम जाजू यांनी गीता देवी यांचे डोळे संकलित केले. गीतादेवी आज या जगातून गेल्या असल्या तरी त्यांच्या डोळ्यांद्वारे दोन नेत्रहीन लोक हे जग पाहतील.
गीतादेवी यांनी पती गणपतलालजी अग्रवाल यांच्यासोबत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या संसाराचा गाळा रेटला. सर्व मुलांना उच्च शिक्षण दिले. त्यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ व दयाळू होता. त्यांचे व त्यांचे पती गणपतलालजी अग्रवाल यांचे चांगले गुण त्यांच्या सर्व मुलांमध्ये आले आहेत. त्यातही सर्वात लहान पुत्र मनोज अग्रवाल यांनी तर अक्षरशः शून्यातून विश्व निर्माण केले आहे. आजघडीला मनोज अग्रवाल हे फक्त बीड शहरातच नाही तर संपूर्ण बीड जिल्ह्यात एक सुहृदयी व्यक्तीमत्व यशस्वी व सुप्रसिद्ध व्यापारी म्हणून ओळखले जातात. आपल्या आई-वडिलांसारखेच तेही सर्वसामान्य गोरगरिबांच्या अडीअडचणीत धावून जातात. असे हे मनोज अग्रवाल आणि त्यांचे सर्व बंधू आता आईच्या मायेला पारखे झाले आहेत. गीतादेवी यांच्या पार्थिवावर रविवार दिनांक २३ जून २०२४ रोजी सकाळी १०:०० वाजता मोंढा रोडवरील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गीतादेवी यांच्या मागे पती गणपतलालजी अग्रवाल, एक मुलगी, प्रमोद, अजय, विजय आणि मनोज ही चार मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. अग्रवाल कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात एस.एम.न्युज परिवार सहभागी आहे.

================================



"आमच्या सेवा"
१) कार्यालयीन निवेदन व बातमी योग्य दरात लिहून मिळेल 
२) विविध वृत्तपत्रात व एस.एम. न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) कार्यक्रम स्थळी येऊन बातमी लिहून मिळेल.
संपर्क -
*एस.एम.युसूफ़* 
मुख्य संपादक - एस.एम.न्युज, वेब पोर्टल तथा यूट्यूब चैनल
आसेफ़नगर, बीड
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत