Breaking News

वडील किडनी देऊ लागले मात्र शस्त्रक्रियेसाठी पैसे नाहीत!दानशुरांनी आर्थिक मदत करण्याचे आवाहन

परंडा (एस.एम.न्युज़) - येथील ३७ वर्षीय तरुणाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने त्याला वाचविण्यासाठी शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. मुलाचा जीव वाचावा म्हणून वडील आपली एक किडनी मुलाला देऊ लागले आहेत. शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांनी अंदाजीत खर्च १० लाख ७५ हजार दाखविला असून गरीब कुटुंबातील असलेल्या बापाने आपल्या मुलासाठी गेल्या काही महिन्यात जंग जंग पछाडले. मुख्यमंत्री सहायता निधी, प्रधानमंत्री सहायता निधीतून मदत घेण्याकरिता आवश्यक ती कागदपत्रेही गोळा केली. तरीही एवढ्या मोठ्या रकमेची गोळाबेरीज अजून काही जमून आली नाही. शस्त्रक्रिया करण्याकरिता लागणाऱ्या एकूण अंदाजीत रकमेची जमवाजमव करण्यासाठी अजूनही जवळपास ५ लाख रुपयांची गरज आहे. म्हणून समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन आर्थिक मदत करावी असे आवाहन करण्यात आले असून ०३३८१०१८९००६ या पोस्ट खाते क्रमांकावर किंवा ९८८१२४४५९५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर मदत पाठवावी. अशी कळकळीची विनंती करण्यात आली आहे.
                    सदरील तरुणाचे नाव मुहम्मद अय्युब जिनेरी असे आहे. ३७ वर्षे वय असलेला हा तरुण उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्याचा रहिवासी आहे. कोरोना काळात त्याला कोरोना झाला होता. तेव्हा झालेल्या औषधोपचारात काही औषधींचे रिएक्शन येऊन कालांतराने त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. हा तरुण परंडा गावात दुचाकी रिपेरिंग करण्याचे काम करतो. त्याला एक सात वर्षाची तर दुसरी तीन वर्षाची मुलगी आहे. वडील गल्लोगल्ली फिरून मिक्सर रिपेरिंग चे काम करतात. घराची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. जीव वाचविण्यासाठी मात्र समोर जवळपास ११ लाख रुपये जमा करण्याचे आवाहन उभे राहिले आहे. याकरिता या तरुणाच्या वडिलांनी आतापर्यंत मुख्यमंत्री निधी, प्रधानमंत्री निधी तसेच काही मित्र व नातेवाईकांकडून आर्थिक मदत घेतली तरीही अजून जवळपास ५ लाख रुपयांची गरज आहे. याकरिता समाजातील दानशूर लोकांनी पुढे येऊन ०३३८१०१८९००६ या पोस्ट खाते क्रमांकावर किंवा ९८८१२४४५९५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर आर्थिक मदत पाठवावी व दोन चिमुकल्या मुलींच्या बापाला शस्त्रक्रिया करून वाचविण्यासाठी हातभार लावावा असे कळकळीचे आवाहन करण्यात आले आहे.

====================================

१) कार्यालयीन निवेदन, अर्ज व वृत्तपत्रात देण्यासाठी बातम्या योग्य दरात लिहून मिळेल.
२) एस.एम.न्युज़ वेब पोर्टल-युट्युब चॅनेल आणि वृत्तपत्रात देण्यासाठी जाहिराती स्वीकारल्या जातील. 
३) विशेष सेवा - कार्यक्रम स्थळी येऊन बातमी लिहून मिळेल.
संपर्क साधा - एस.एम.युसूफ़ 
मुख्य संपादक - एस.एम.न्युज़
आसेफ़नगर, बीड.
मो.- 9021 02 3121

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत