बीड तहसील समोर ग्राहकांची आर्थिक लूट; व्यापारी मस्त ग्राहक त्रस्त!
बीड (एस.एम.न्युज़) - येथील तहसील कार्यालयाच्या आवारात बसणारे बॉण्ड व तिकीट विक्रेते आणि तहसील समोरील झेरॉक्स आणि लॅमिनेशनवाल्यांनी ग्राहकांची आर्थिक लूट सुरू केली आहे. लूट करणाऱ्या या सर्वांनी माणुसकी सोडली असल्याचे दिसून येत आहे. यामुळे व्यापारी जरी मस्त झाले असले तरी ग्राहक मात्र त्रस्त झाले आहेत.
बीड तहसील च्या आवारात आणि समोर आपापले उद्योग करणाऱ्या सर्वांनी व्यवसाय करताना कुठलेही तारतम्य ठेवले नाही. मनाला येईल त्याप्रमाणे दर आकारणी करायची आणि ती अडवणूक करून ग्राहकांकडून वसूल करायची. असा शिरस्ता या सर्वांनी येथे सुरू केला आहे. तहसील कार्यालयाच्या आवारात बसलेले बॉण्ड व तिकीट विक्रेते बॉण्ड वरील मुद्रित किमतीपेक्षा जास्त पैसे घेऊन बॉण्डची विक्री करू लागले आहेत तर तिकीट विक्रीमध्ये तर यांनी चवच सोडली आहे. इथे ५ रुपये किमतीचे तिकीट चक्क दाम दुप्पट दराने म्हणजेच १० रुपयात विक्री केले जात आहे तर इतर तिकिटांमागेही दीडपट किंवा दुपटीने रक्कम घेऊन तिकीट दिले जात आहे. हे कमी होते की काय म्हणून तहसील समोरील झेरॉक्स सेंटर वाल्यांनीही डीटीपी करून देण्याचे दर अव्वाच्या सव्वा करून टाकले आहे. ए-४ चा एक कागद टाईप करून द्यायचं म्हणल्यावर हे ८० ते १०० रुपये घेऊ लागले आहेत. एवढेच नाही तर कुणी मोबाईलवर टाईप केलेल्या मजकुराची प्रिंट काढून द्या व त्यास लॅमिनेशन करून द्या म्हणून सांगितले तर त्याचेही शंभर रुपये वसूल करू लागले आहेत. अशाप्रकारे तहसीलच्या आवारातील बॉण्ड व तिकीट विक्रेते आणि समोरील झेरॉक्स व डीटीपी दुकानवाल्यांनी अक्षरशः लूट चालविली आहे. यामुळे ग्राहक जरी त्रस्त होत असले तरी व्यापारी मात्र मस्त होत असून आर्थिक लूट करून आपले उखळ पांढरे करून घेत आहेत. याला कुठेतरी आळा बसणे किंवा घालणे आवश्यक झाले आहे. अन्यथा यांची अशी मनमानी वाढत जाईल आणि यांच्याकडे ग्राहक म्हणून गेलेल्यांचा त्रास वाढतच जाईल.
दरपत्रक ठळक अक्षरात लावणे सक्तीचे करावे
तहसीलच्या आवारात बसणारे बॉण्ड व तिकीट विक्रेते तसेच तहसील समोर खाजगी जागेत असलेले डीटीपी व लॅमिनेशन करून देणाऱ्या दुकानदारांना प्रत्येक वस्तूचे दर व त्यांच्याकडून ग्राहक करून घेत असलेल्या कामाचे दर दर्शनी भागात ठळक अक्षरात लिहून लावणे बंधनकारक करण्यात यावे. जेणेकरून त्यांच्याकडे गेलेल्या ग्राहकांची दरपत्रक पाहिल्यानंतर लुटी पासून सुटका होईल.
यांच्याकडून अधिकारी हप्ते तर घेत नाहीत ना?
तहसील मध्ये येणाऱ्यांकडून आवारात बसलेले विक्रेते व तहसील समोरील दुकानदारांकडून होत असलेल्या आर्थिक लुटीची चर्चा मोठ्या प्रमाणात होत असूनही येथील अधिकारी मूग गिळून गप्प असल्याने यांच्याकडून अधिकाऱ्यांना हप्ते तर मिळत नाहीत ना? असा प्रश्न लोकांकडून उपस्थित केला जात आहे.
विक्रेत्यांना भाडे भरावे लागते काय?
येथे बॉण्ड व तिकीटसाठी व्यावसायिकांकडून ग्राहकांची करण्यात येत असलेली लूट पाहून तहसील च्या आवारात दिवसभर बसून बॉण्ड व तिकीट विक्री करणाऱ्यांकडून तहसील प्रशासनाला ते करत असलेल्या व्यवसायाचे भाडे मिळते का? असा प्रश्नही या अनुषंगाने उपस्थित केला जात आहे.
काय तर म्हणे औरंगाबादहून आणावे लागते?
बीड तहसीलच्या आवारात आणि मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवसभर बसून बॉण्ड व तिकीट विकणाऱ्या काही जणांना याविषयी बोलते केले असता त्यांचे म्हणणे आले की, औरंगाबादहून आणावे लागते येण्या-जाण्याचा खर्च लागतो किंवा ट्रान्सपोर्ट नि मागविले तर त्याचा खर्च लागतो म्हणून जास्त दर आकारणी करून विकत आहोत.
विक्रेते व दुकानदार जनतेच्या सेवेसाठी की अडवणुकीसाठी?
उद्योग व्यवसाय कोणताही असो तो ग्राहक हिताय-ग्राहक सुखाय या दृष्टिकोनातून चालवले गेले पाहिजे. मात्र असे न होता विक्रेते व दुकानदार मनमानीपणे बॉण्ड व तिकीटांची रक्कम वसूल करताहेत तर झेरॉक्स दुकानदार डीटीपी आणि लॅमिनेशनचे मनाला येईल त्याप्रमाणे दर वसूल करताहेत याला संबंधित अधिकाऱ्यांनी कुठेतरी आळा घालणे आवश्यक आहे.
=======================================
१) कार्यालयीन निवेदन अर्ज व वृत्तपत्रात देण्यासाठी बातम्या आणि लेख योग्य दरात लिहून मिळेल.
२) एस.एम.न्युज़ वेब पोर्टल-युट्युब चॅनेल आणि वृत्तपत्रात देण्यासाठी जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) विशेष सेवा - कार्यक्रम स्थळी येऊन बातमी लिहून मिळेल.
संपर्क साधा - एस.एम.युसूफ़
मुख्य संपादक - एस.एम.न्युज़
आसेफ़नगर, बीड.
मो.- 9021 02 3121
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा