Breaking News

बीड नगर परिषदेच्या सर्व बोअर्स पूर्ववत सुरू करासर्व खाजगी विहीर व बोअर्सचे अधिग्रहण करा

बीड (एस.एम.न्युज़) - गेल्या वर्षी अत्यंत कमी प्रमाणात पडलेल्या पावसाने निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी बीड नगर परिषदेने बीड शहरात घेतलेल्या परंतु सद्यस्थितीत बंद अवस्थेत असलेल्या सर्व बोअर्स पूर्ववत सुरू करावे तसेच शहरातील सर्व खाजगी विहीर व बोअर्सचे अधिग्रहण करावे अशी मागणी एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक एस.एम.युसूफ़ यांनी जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी आणि बीड तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, काही वर्षांपूर्वी बीड नगर परिषदेकडून संपूर्ण बीड शहराच्या वेगवेगळ्या प्रभागात, वार्डात मोठ्या प्रमाणात बोअर्स घेण्यात आलेले आहे. सदरील बोअर्स घेतल्यानंतर ते काही वर्षे सुरळीत चालविले गेले मात्र नंतर देखभाली अभावी व डागडूजी न केल्याने एकेक करत बीड नगर परिषद चे जवळपास शहरातील सर्व बोअर्स बंद पडलेले आहेत. यात काही बोअर्स हात पंपावर आहेत तर काहींना सबमर्सिबल मोटारीही टाकलेल्या आहेत. विशेष म्हणजे यातील अनेक बोअर्सना मुबलक प्रमाणात पाणी आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात योग्य प्रमाणात पाऊस न पडल्याने यावर्षी दुष्काळ पडले आहे. यामुळे आता बीड जिल्ह्यासह बीड शहरातही मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सध्या बीड शहरात नगर परिषदेकडून कुठे १० ते १५ तर कुठे १५ ते २५ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. अजून पावसाळा सुरू होण्यास चार महिन्याचा कालावधी बाकी आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ बीड शहरवासीयांवर आलेली आहे. ही परिस्थिती पाहता बीड नगर परिषदेने बीड शहरात घेतलेल्या सर्व बोअर्स ची डागडूजी करून बंद पडलेले सर्व बोअर्स पुर्ववत सुरू करावेत. तसेच बीड शहरातील प्रत्येक खाजगी विहीर व प्रत्येक खाजगी बोअर्स चे अधिग्रहण करावे. अशी मागणी एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक एस.एम.युसूफ़ यांनी जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी आणि बीड तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.



========================================== 



१) कार्यालयीन निवेदन अर्ज व वृत्तपत्रात देण्यासाठी बातम्या आणि लेख योग्य दरात लिहून मिळेल.
२) एस.एम.न्युज़ वेब पोर्टल-युट्युब चॅनेल आणि वृत्तपत्रात देण्यासाठी जाहिराती स्वीकारल्या जातील. 
३) विशेष सेवा - कार्यक्रम स्थळी येऊन बातमी लिहून मिळेल.
संपर्क साधा - एस.एम.युसूफ़ 
मुख्य संपादक - एस.एम.न्युज़
आसेफ़नगर, बीड.
मो.- 9021 02 3121

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत