Breaking News

नशा मुक्ती साठी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांचे एक पाऊल पुढे नशाखोरीला आळा घालण्यासाठी औषध विक्रेत्यांची घेतली बैठक

बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील नशाखोरीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी एक पाऊल पुढे टाकत पोलीस अधीक्षक कार्यालयात औषध विक्रेत्यांची बैठक घेऊन नशा मुक्ती साठी विविध मुद्दे मांडून त्यावर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.
            बीड शहरात नशेच्या गोळ्या,औषधी यांची सर्रासपणे चोरटी विक्रीमुळे लहान व तरुण मुले व्यसनाधीन होत असल्याने या प्रकरणाचे गांर्भीय लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांच्या अध्यक्षतेखाली बीड शहरातील मेडीकल असोसिएशन, औषध विक्रेते, अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी यांची पोलीस अधीक्षक कार्यालयात दिनांक ११ ऑक्टोबर २०२३ रोजी घेण्यात आलेल्या बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त आर.एम.बजाज, मेडीकल असोसिएशन पदाधिकारी व बीड शहरातील औषध विक्रेते बैठकीस हजर होते. या बैठकीमध्ये पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी औषध विक्रेते यांना नशेशी संबंधीत गोळ्या व औषधे वैद्यकीय अधिकारी यांचे सल्ल्याशिवाय (Prescription) कोणासही विक्री करु नये याबाबत सूचना दिल्या. सर्व मेडीकल विक्रेते यांनी आपले दुकान परिसर येथे किमान एक महिना स्टोरेज क्षमता असलेले CCTV कॅमेरे लावावेत. जर कोणी ग्राहक विना Prescription नशेची गोळ्या,औषधे खरेदी करण्याकरिता दुकानात आल्यास अशा संशयिताबाबत तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. तसेच डॉक्टर यांचे सल्ल्याशिवाय ( Prescription) नशेशी संबंधीत गोळ्या,औषधांची विक्री करतांना कोणी औषध विक्रेता आढळून आल्यास त्यांचेविरुध्द कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याबाबत सूचना दिल्या.


======================================
१] कार्यालयीन निवेदन अर्ज व वृत्तपत्रात देण्यासाठी बातमी आणि लेख योग्य दरात लिहून मिळेल 
२] विशेष सेवा - कार्यक्रम स्थळी येऊन बातमी लिहून मिळेल 
३] वृत्तपत्र व एस.एम.न्युज़ साठी बातम्या आणि जाहिराती स्वीकारल्या जातात 
संपर्क साधा - एस.एम.युसूफ़ 
मुख्य संपादक - एस.एम.न्युज़ 
आसेफ़नगर, बीड. 
मो.- 9021 02 3121

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत