अल्ताफ दादासाहेब शेख देणार नवीन कलाकारांना मराठी चित्रपटात काम येण्या-जाण्याचा खर्च व मानधनही मिळणार
पुणे (एस.एम.न्युज) - प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक गीतकार अभिनेते अल्ताफ शेख यांनी नवीन कलाकारांना मराठी चित्रपटात काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली असून यासाठी पुणे येथे ऑडिशन घेण्यात येणार आहे.
अल्ताफ शेख यांच्या दिग्दर्शनात तयार होत असलेला चित्रपट व ऑडिशन हे अ.भा.चि. महामंडळाच्या परवानगीने होत आहे. या चित्रपटासाठी काम करणाऱ्या कलाकारांना ग्रामीण भाषेस प्राधान्य द्यावे लागणार आहे. कारण हा चित्रपट ऐतिहासिक बायोपिक आहे.
या चित्रपटात अभिनय करण्यासाठी सर्वच वयोगटातील कलाकारांना संधी आहे. चित्रपटासाठी ०८ ते ६० वर्षे वयोगटातील कलाकारांची निवड करण्यात येणार आहे. कलाकारांची निवड झाल्यानंतर सदर चित्रपटातील काम हे वाई, सातारा, पुणे आणि महाराष्ट्रात असेल. प्रवास खर्च व योग्य मानधन ही दिले जाणार आहे. कलाकारांनी ऑडिशनसाठी येताना सोबत स्वत:चा एक फुल साईज कलर फोटो घेऊन येणे जरुरी आहे.
कलाकारांना ग्रामीण भाषा चांगल्या प्रकारे अवगत असणे आवश्यक आहे. कलाकारांची ऑडिशन दिनांक २८ व २९ ऑक्टोबर शनिवार व रविवार अशी २ दिवस ठेवण्यात आली आहे. हे दोन दिवसीय ऑडिशन सत्र फिल्म मेकर अकॅडमी, सम्राट गॅलरी दुसरा मजला, शिव कॉलनी लेन नं-४, वाकड पोलीस स्टेशन वाकड, पुणे (महाराष्ट्र) येथे घेण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी खालील भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकता - ८९७५३०३९२४ तसेच चित्रपट , लेखक, दिग्दर्शक, गीतकार व अभिनेते अल्ताफ शेख यांच्या Altaf Dadasaheb Shaikh https://g.co/kgs/SkcMQL या वेबसाईटवर सुद्धा जाणून घेऊ शकता. अशी माहिती लेखक दिग्दर्शक अल्ताफ शेख यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून कळविली आहे.
=====================================
१} कार्यालयीन निवेदन अर्ज व वृत्तपत्रात देण्यासाठी बातमी आणि लेख योग्य दरात लिहून मिळेल
२} वृत्तपत्रे व एस.एम.न्युज साठी जाहिराती आणि बातम्या स्वीकारल्या जातात
३} विशेष सेवा - कार्यक्रम स्थळी येऊन बातमी लिहून मिळेल.
संपर्क साधा - एस.एम.युसूफ़
मुख्य संपादक - एस.एम.न्युज
आसेफ़नगर, बीड
मो.- 9021 02 3121
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा