Breaking News

जिल्हा रुग्णालयातील आयसीयू कक्षालाच जीवन रक्षक प्रणालीची गरज! एसी बंद असल्याने अत्यावस्थ रुग्णांसह नातेवाईक ही बेजार


बीड (एस.एम.न्युज) - जिल्हा रुग्णालयात आयसीयू कक्षातील एसी बंद असल्याने अत्यावस्थ रुग्णांसह रुग्णांसोबत असलेल्या नातेवाईकांचे हाल होत असून आता या कक्षालाच जीवन रक्षक प्रणालीची आवश्यकता असल्याचे दिसत आहे.
                      जिल्हा रुग्णालयातील आंतररुग्ण विभागात असलेल्या आयसीयू कक्षातील एसी सतत बंद असल्याने येथे उपचार घेत असलेले अत्यावस्थ रुग्णांसह नातेवाईकांचे हाल होत आहेत. एकतर आयसीयू कक्षात प्रत्येक पेशंट साठी स्वतंत्र केबिन करण्यात आलेली आहे. यामुळे प्रत्येक केबिनच्या पार्टिशनमुळे या कक्षात नैसर्गिक हवा खेळती राहत नाही. म्हणून एसी व पंख्यांवर अवलंबून राहावे लागते. मात्र येथील फक्त पंखे चालू असून एसी मात्र सतत बंदच असते. म्हणून येथील रुग्णांना व रुग्णांसोबत असलेल्या नातेवाईकांना प्रचंड प्रमाणात उकाळा सहन करावा लागत असून अक्षरशः या दालनात रुग्णाच्या सुशृषेसाठी सोबत असलेल्या नातेवाईकांच्या जीवाची अक्षरश: घालमेल होत आहे. रुग्णाला श्वासोच्छवासाठी रुग्णालयात ऑक्सिजन व व्हेंटिलेटर आहे. परंतु रुग्णांसोबत असलेल्या नातेवाईकांना चांगला व व्यवस्थित श्वास घेण्यसाठी कक्षा बाहेर जाऊन श्वास घेऊन पुन्हा कक्षात जावे लागत आहे. एवढी घुसमट कक्षाच्या आत होत आहे. याकडे या कक्षात कर्तव्यावर असणाऱ्या नर्सेस व इतर कर्मचाऱ्यांचे लक्ष नाही. शिवाय जिल्हा शल्य चिकित्सक व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांचे आयसीयू कक्षाकडे हवे त्या प्रमाणात लक्ष नसल्याचे दिसते. यामुळे आता जिल्हा रुग्णालयातील आयसीयू कक्षालाच जीवन रक्षक प्रणालीची गरज असल्याचे म्हणावेसे वाटते.

डॉ.बडे साहेब आयसीयू कडे विशेष लक्ष द्या

जिल्हा रुग्णालयातील आयसीयू कक्षात जीवनमरणाच्या दारात असलेले रुग्ण असतात. त्यांना चांगल्या उपचारासह वातावरण ही चांगले मिळणे आवश्यक असते. मात्र बीड जिल्हा रुग्णालयातील आयसीयू कक्षात नेमकी याचीच वाणवा आहे. रुग्णाला येथे ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर तर मिळते परंतु रुग्णासोबत असलेल्यांना चांगला श्वास घ्यायला मिळत नाहीये. आयसीयू च्या दोन्ही बाजूच्या कक्षात प्रचंड प्रमाणात उकाळा होतोय. येथे लावलेले पंखे हा उकाळा दूर करण्याइतपत सक्षम नाहीत. शिवाय प्रत्येक रुग्णासाठी बनविण्यात आलेल्या केबिन च्या पार्टिशनमुळे येथील पंख्यांची हवा कुचकामी ठरत आहे. हे लक्षात घेता आयसीयूच्या दोन्ही कक्षामधील एसी सतत चालू ठेवणे आवश्यक आहे. याकडे जातीने लक्ष घाला व एसी नियमितपणे सुरू ठेवण्याचे आदेश या कक्षात कर्तव्यावर असणाऱ्या नर्सेस व कर्मचाऱ्यांना द्या. जेणेकरून अत्यावस्थ रुग्णांच्या दिमतीला आलेल्या नातेवाईकांवर स्वतःच्या जीवाची घुसमट करण्याची वेळ येऊ नये. या घुसमटीमुळे नातेवाईकांवर अर्धमेले होण्याची वेळ येऊ नये याकडे लक्ष द्या.


========================================

१} कार्यालयीन निवेदन अर्ज व वृत्तपत्रात देण्यासाठी बातमी आणि लेख योग्य दरात लिहून मिळेल
२} वृत्तपत्रे व एस.एम.न्युज साठी जाहिराती आणि बातम्या स्वीकारल्या जातात 
३} विशेष सेवा - कार्यक्रम स्थळी येऊन बातमी लिहून मिळेल. 
संपर्क साधा - एस.एम.युसूफ़
मुख्य संपादक - एस.एम.न्युज
आसेफ़नगर, बीड 
मो.- 9021 02 3121


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत